Shinde vs Thackeray :  Saam tv
महाराष्ट्र

Shinde vs Thackeray : हातकणंगलेत हायव्होल्टेज राडा! शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी

Shinde vs Thackeray party workers : हातकणंगलेतील एका मतदान केंद्रावर ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली.

विजय पाटील

सांगली : राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे. या पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघातील विविध मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात राजकीय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशीच परिस्थिती हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पहायला मिळत आहे. याचदरम्यान हातकणंगलेतील एका मतदान केंद्रावर ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वाळवा तालुक्यालील साखराळे गावातील मतदान केंद्रावर सकाळापासून मतदान हजेरी लावत आहेत. या मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर आले होते. हे सर्व कार्यकर्ते बूथ क्रमांक 62,63 वर जमले होते. त्याचवेळी या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी झाली.

नेमकं काय घडलं?

यावेळी मतदान केंद्र क्रमांक 62 आणि 63 वर सत्यजित पाटील सरूडकर यांचे बोगस प्रतिनिधी यांच्यावर कारवाई करावी, मागणी करत धैर्यशील माने यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्र काही काळ बंद ठेवलं होतं. त्यामुळे सत्यजीत पाटील सरुडकर यांचे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत दोन्ही गटात शाब्दिक वादावादी होऊन राडा झाला.

पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केला, त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. सध्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिसांचा हस्तक्षेप झाल्यानंतर आता सध्या मतदान सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळकत आहे. या घटनेनंतर धैर्यशील माने गटाचे दत्तात्रेय पाटील यांनी सत्यजित पाटील सरूडकर यांच्या बोगस प्रतिनिधींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : वाळूने भरलेल्या टिप्परने दुचाकीस्वाराला चिरडले, मृतदेहाचे तुकडे, भंडाऱ्यात भयानक अपघात

Ravi Naik passes away : माजी मुख्यमंत्र्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, संपूर्ण गोव्यावर शोककळा

Maharashtra Politics: ३ महिन्यांपासून वकील बेपत्ता, पत्नीचे शिंदेंच्या आमदारावर गंभीर आरोप

PF Rule Change: कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; पीएफच्या नियमात मोठा बदल आता पीएफ काढता येणार 100 टक्के

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT