Baramati Lok Sabha : बारामतीकरांना ४ जूनला गोड बातमी मिळणार; दोन VIDEO नंतर रोहित पवारांना विश्वास

Rohit Pawar News: बारामतीत महायुतीचा पराभव निश्चित असून येत्या ४ जूनला गोड बातमी मिळेल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
Rohit Pawar
Rohit Pawar Saam Tv

बारामती लोकसभा मतदारसंघात आम्हाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही गुंडागर्दी, दडपशाही तसेच आर्थिक ताकदीच्या बाजूला झुकणार नाही, असं मतदार आम्हाला सांगत आहे. त्यामुळे येत्या ४ जूनला नक्कीच गोड बातमी, मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Rohit Pawar
Narayan Rane: मी सर्वात हुशार विद्यार्थी, अभ्यास करूनच पेपरला बसतो; नारायण राणे काय म्हणाले?

आमदार रोहित पवार यांनी बारामतीत जाहीर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार गटावर काही गंभीर आरोप केले. "बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण १५५ संवेदनशील बूथ आहेत, असं आम्ही पोलिसांना सांगितलं आहे".

"अजित पवार गट दमदाटी करत असल्याच्या आम्हाला २५० तक्रारी आल्या आहेत. यातील १८ तक्रारी पैसे वाटपाच्या आहेत. त्यातील काही व्हिडीओ आम्ही ट्विट केले आहेत. मारहाण, शिवीगाळ बुथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न अशा ८ तक्रारी आहेत. ईव्हीएमबाबत ३८ तक्रारी आल्या असून त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय", असं रोहित पवारांनी सांगितलं.

बोगस मतदान करण्याचा पहिला प्रयत्न वेल्हेमध्ये झाला. ज्या गुंडाचा फोटो मी दोन दिवसांपूर्वी ट्विट केला होता. तो २५ लोक घेऊन बुथमध्ये शिरला होता, अशी आतापर्यंतची परिस्थिती आहे. तरी आम्हाला कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असंही रोहित पवार म्हणाले.

येत्या काळात लोकांना ४ जूनला गोड अशी बातमी मिळेल. अजित पवार गटाबाबतच्या बहुतांश तक्रारी बारामती येथून आल्या आहेत. याचाच अर्थ असा की, अजित पवार गटाने आपलं संपूर्ण लक्ष बारामती विधानसभेवर ठेवलं आहे. इतर मतदारसंघाला त्यांनी वाऱ्यावर सोडलेलं दिसतंय.

म्हणजेच काय आताच आपण कुठेतरी निवडणूक हरलो आहे, हे महायुतीच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. बारामतीत आपण कुठेतरी कमी पडू नये म्हणून त्यांची धडपड सुरू आहे, असं कुठेही जाणवत आहे, असंही रोहित पवार म्हणाले.

ऐन मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या काटेवाडीतील घरी गेल्या होत्या. यावर देखील रोहित पवार यांनी भाष्य केलं. "सुप्रिया ताई आशाकाकींना भेटायला अजित पवारांच्या घरी गेल्या होत्या. अनेक दिवसानंतर आशाताई बारामतीत आल्या होत्या. सुप्रिया ताईंनी त्याचा आशीर्वाद घेऊन संस्कृती जपली", असंही आमदार पवार म्हणाले.

Rohit Pawar
Supriya Sule News : दत्ता भरणेंच्या अडचणीत भर; सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार, काय आहे प्रकरण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com