Harshvardhan Patil News Harshvardhan Patil News
महाराष्ट्र

Harshvardhan Patil: फडणवीसांचा प्रस्ताव, शरद पवारांची ऑफर, भाजप सोडताना पाटील काय काय म्हणाले?

Maharashtra Political Updates : इंदापूरमध्ये राजकीय गणितं बदलली आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम ठोकलाय.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024 : इंदापूरमधील दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज अखेर भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. इंदापूरमध्ये (indiapur news) कार्यकर्तांच्या मेळाव्यात बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी आपली राजकीय दिशा स्पष्ट केली. हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील यांनी इंदापूरमधील सर्व कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार (harshvardhan Patil join ncp sharad pawar) असल्याचं जाहीर केले. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी अनेक मुद्दे मांडले. फडणवीस यांचा प्रस्ताव, शरद पवार यांनी दिलेली ऑफर यासह अनेक विषयावर भाष्य केले. भाजप सोडताना हर्षवर्धन पाटील काय काय म्हणाले पाहूयात...

विधानसभेचा (2024 Maharashtra Legislative Assembly election) काय निर्णय घ्यायचा, त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दीड तास चर्चा झाली. इंदापूरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जाणार असल्याचं सांगितलं. तुमच्यासाठी वेगळा निर्णय घेऊ असे सांगितले. पण आपल्याला इंदापूरमध्ये निवडणूक लढवायची आहे. फडणवीस यांचा दुसरा पर्याय मान्य नव्हता. काल शरद पवार यांच्यासोबत दीड तास बैठक झाली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक झाली.

पवार साहेबांनी मला पक्षात येण्याचा आग्रह धरला. त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मी आणि माझे कार्यकर्ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत, अशी घोषणा हर्षवर्धन पाटील यांनी केली.

पवार कुटुंबियांसोबत चांगले संबंध -

राजकारणात कोण कुणाचा शत्रू नसते. अनेक वर्षांपासून पवार कुटुंबासोबत चांगले संबंध आहेत. आज मी शरद पवार यांच्या पक्षात गेलो म्हणजे काही राजकीय संबंध संपले असा नाही. सर्वांसोबत चांगले संपत नाहीत. मी, अंकिता आणि तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मागील दहा वर्षांत इंदापूरच्या जनतेवर अन्याय झाला. आमच्या पाठीशी असणाऱ्यांना त्रास झाला.

फडणवीसांचा प्रस्ताव अमान्य -

विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे असा सर्व कार्यकर्त्यांचा प्रचंड आग्रह होता. ⁠मी मधील चार-पाच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलो. विधानसभा निवडणुकीसाठी काय निर्णय घ्यायचा घ्यायचा यासाठी मी भेट घेतली. फडणवीस यांनी काही प्रस्ताव माझ्यासमोर ठेवले. मी माझी भूमिका मांडली. ⁠फडणवीस यांनी ठेवलेला प्रस्ताव माझ्यासाठी त्याचबरोबर माझ्या कार्यकर्त्यांसाठी योग्य नव्हता. त्यानंतर परवा मला शरद पवार यांचा निरोप आला मला भेटायला या⁠. या बैठकीला सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. पवार साहेबांनी आग्रह धरला, तुम्ही आमच्या पक्षात या.

जो निर्णय घ्यायचा तो घ्या, असे फडणवीस म्हणाले

विधानसभा निवडणूक संदर्भात शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. तालुक्यातील बऱ्याच लोकांचा तुम्ही विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह आहे असं पवार साहेब म्हणाले. याआधी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाली. तालुक्यातील कार्यकर्त्याचा आग्रह मी मोडू शकत नाही असे मी त्यांना सांगितले. तालुक्यातील जनतेला काय वाटते त्याचा आदर मी करणार आहे.त्यावर जो निर्णय घ्यायचा तो घ्या असे फडणवीस म्हणाले. त्यांनंतर मी पवार साहेबांना भेटलो.

2019 ची निवडणूक आपण जिंकता जिंकता हरलो. 2014 चा पराभवाची खदखद आहे. आपल्याला काय त्रास सहन करावा लागला हे आपण पाहिलं. आपल्याला कुणाविषयी वाईट बोलायचे नाही. आपल्याला संयम पाळायला आहे. पवार साहेबांचे आणि आपले व्यक्तिगत संबंध आहेत. कुणावर टीका करू नका. आपण सुसंस्कृत आहोत. येणाऱ्या काळात इंदापूर तालुक्याचा राजकीय वनवास संपल्याशिवय राहणार नाही.
हर्षवर्धन पाटील

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?

पाटील कुटुंब हर्षवर्धन पाटील यांचं पाटील कुटुंब आणि पवार कुटुंबे यांचे सहा दशकांचे संबंध आहेत ते पुन्हा आमच्याकडे येत आहेत याचा आनंद आहे मधल्या काळात विचार वेगळे झाले होते मात्र आमचे संबंध कायम होते. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील काहीजण नाराज झाले असतील तर ते साहजिक आहे कारण प्रत्येकाला वाटते की आपल्याला उमेदवारी मिळावी मात्र हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देताना इंदापूर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे आणि जे नाराज आहेत त्यांची समजूत काढणं हे आमचं काम आहे ते आम्ही करू, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT