नितीन पाटणकर, पुणे
Indapur Politics Harshvardhan Patil News: गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या मुलांनी त्यांचे डीपीही बदलल्याने त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चिच मानला जात होता. याबाबत आज इंदापूरमध्ये जाहीर मेळावा घेत हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याची अधिकृत घोषणा केली. विधानसभेच्या तोंडावर भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
आज आपल्याला अंतिम निर्णय घ्यायचा आहे. आज आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की नाही घ्यायचा ? असे म्हणताच उपस्थित कार्यकर्त्यांकडून हो म्हणत घोषणा देण्यात आल्या. 'गुरुवारी मला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलं होतं. साडेबारा वाजता सिल्वर ओपन बैठक झाली. शरद पवार यांनी मला सांगितलं तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही निर्णय घेतल्यानंतर बाकीची जबाबदारी माझी राहील, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.'
1995 मध्ये तालुक्यातील जनतेने आणि कार्यकर्त्यांनीच आग्रह धरला म्हणून आपण बंडखोरी करू अपक्ष निवडणूक लढवली. त्यानंतर पुन्हा जनतेनेच आग्राह धरला म्हणून आपण काँग्रेसमध्ये गेलो. त्यानंतर 2019 मध्ये तुम्हीच आग्रह धरला म्हणून आपण भाजपमध्ये गेलो, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. पवार साहेबांचं कुटुंब आणि आपलं कुटुंबाचे व्यक्तिगत संबंध आहेत. हे व्यक्तिगत संबंध सहा दशकांचे आहेत, असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी माझी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरही बैठक झाली. त्यांच्याबरोबरही सविस्तर चर्चा झाली. त्यांना मी माझी आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांची भूमिका सांगितली. देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं माझी ही काही अडचण आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा निर्णय घ्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंडळांचा अर्थ न समजण्याएवढा मी खुळा नाही, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
इंदापूरमध्ये आज भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी पुढील राजकीय वाटचालीची घोषणा केली. कालच हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवरच आजचा हा मेळावा पार पडला. शरद पवार आणि माझी सिल्व्हर ओकला बैठक झाली. या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. यावेळी पवार साहेबांनी विधानसभेची निवडणूक लढवा, जनतेचा कल असेल तर तुम्ही निर्णय घ्या.
हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग आला होता. इंदापूर शहरात असणाऱ्या भाजप कार्यालयावरील फ्लेक्स रातोरात हटवण्यात आले. इंदापूर शहरातील त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालया वरील संपूर्ण फलक हटवण्यात आले असून त्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा ,जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो व कमळ चिन्ह देखील काढण्यात आले आहे.
हर्षवर्धन पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील मोठे नेते मानले जातात. १९९५ मध्ये ते पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९९ आणि २००४मध्येही त्यांनी अपक्ष विधानसभेची निवडणूक लढवली. २००९ मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी अधिकृतपणे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये ते १९९५ ते २०१४ पर्यंत मंत्रीही होते. मात्र २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी तुटली. या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा दत्तात्रय भरणे यांच्याकडून पराभव झाला. त्यामुळे २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नुकतीच त्यांची राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदीही निवड करण्यात आली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.