Happy Birthday Sachin Saam TV
महाराष्ट्र

Happy Birthday Sachin: टाळ-मृदंगाच्या गजरात सचिनची भव्य मिरवणूक, गावकऱ्यांनी उभारल्या गुढ्या पाहा VIDEO

Sachin Tenudlkar 50th Birthday: गावात ढोल ताशांच्या गजरात मोठी मिरवणूक काढण्यात आली आहे.

विजय पाटील

Sangli: क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरचा आज पन्नासावा वाढदिवस आहे. सचिनचा चाहतचा वर्ग इतका मोठा आहे की, गावागावात आणि खेड्यापाड्यात सगळीकडे त्याचा वाढदिवस चाहते जल्लोषात साजरा करतात. अशात सांगलीमध्ये अगळ्या वेगळ्या पद्धतीने सचीनचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. गावात ढोल ताशांच्या गजरात मोठी मिरवणूक काढण्यात आली आहे. (Sachin Tenudlkar Birthday Celebration in sangli)

सांगलीच्या इस्लामपूर येथील सचिन जाधव दिग्दर्शित 'तेंडल्या' चित्रपटाची खरी सुरुवात ज्या गावातून झाली त्या शिराळा तालुक्यातील औंढी या गावांमध्ये हा जल्लोष साजरा करण्यात आला आहे. आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित गावातून सचिनचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे.

गावातून पालखीतून सचिनच्या प्रतिमेची भव्य रॅली काढण्यात आली. एखादा सण ज्या पद्धतीने साजरा करावा तशी सचिनच्या वाढदिवसाची जंगी तयारी करण्यात आली आहे. गावात सर्वजण नविन कपडे घालून भव्य रॅलीत सहभागी झाले आहेत. तसेच गावातील महिलांनी आपल्या दारात सुंदर रांगोळी काढली आहे. इतकेच नाही तर काही गावकऱ्यांनी घरासमोर गुढी उभारली आहे.

सुप्रसिद्ध क्रीडा समीक्षक सुनंदन लेले हे स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. संपूर्ण गाव मोठ्या हिरीरीने यामध्ये सहभागी झाला आहे. गावात सचिनचे भलेमोठे पोस्टर लावण्यात आले आहेत. तेंडल्या या चित्रपटाचे प्रमोशन ही यावेळी करण्यात येत आहे.

डायपर लावून मैदानात उतरला अन् ठोकल्या 97 धावा..

ही गोष्ट २००३ वर्ल्ड कप स्पर्धेतील आहे. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू होता. हा सामना दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये सुरू होता. या सामन्यापूर्वी सचिन डिहायड्रेशनशी झुंज देत होता. अशा परिस्थितीत स्वत:ला फिट ठेवण्यासाठी त्याने पाणी आणि एनर्जी ड्रिंक्ससोबत मीठ घेण्यास सुरुवात केली. या कारणामुळे त्याचे पोट खराब झाले होते. (Sachin Tendulkar Birthday Special)

त्यावेळी तो अंडवेयरमध्ये टिश्यू पेपर लावून मैदानात उतरला होता. या सामन्यात त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत ९७ धावांची खेळी केली होती. अवघ्या ३ धावांनी त्याचे शतक हुकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोकुळवर पुन्हा प्रशासकराज? बैठकीला दांडी, महायुतीचा नवी रणनीती; एकतर्फी अध्यक्ष निवडून पाटलांचा नवा डाव

चार आमदारांचा एकच मामा! प्रतापसिंह पाटलांच्या विजयानंतर राजन पाटलांची चर्चा; अनगरचे मामा-भाचे राजकारणात

Fact Check: तुमच्या सोन्यात चायनीज पावडरची भेसळ? सोन्याचं वजन वाढवण्यासाठी नवी शक्कल?

2019 नंतर उद्धव ठाकरेंनी बोलावलं नाही; ठाकरे बंधूंसमोर मुख्यमंत्र्यांची जोरदार टोलेबाजी|VIDEO

आंघोळीच्या पाण्यात बेकिंग सोडा टाकल्याने त्वचेला फायदा होतो की नुकसान

SCROLL FOR NEXT