2019 नंतर उद्धव ठाकरेंनी बोलावलं नाही; ठाकरे बंधूंसमोर मुख्यमंत्र्यांची जोरदार टोलेबाजी|VIDEO

Raj Thackeray Uddhav Thackeray And Devendra Fadnavis On One Stage: राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘हास्यरेषा’ ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात एकाच मंचावर; फडणवीसांच्या मिश्किल टिप्पणीने सभागृहात हशा.

राजकारणात कधीच कोण कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो. याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. अलीकडच्या काळात ठाकरे बंधू मुख्यमंत्री आणि भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहे. अशातच आज मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना(UBT) प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर आले, निमित्त होते ते प्रशांत कुलकर्णी संपादित हास्यरेषा या मराठी व्यंगचित्रकारांच्या इतिहासावरील विशेष ग्रंथाचा प्रकाशन सोहळ्याचे. या कार्यक्रमात ठाकरे बंधूंनी फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी केली. तर मुख्यमंत्र्यांनी देखील भाषण सुरू झाल्यावर यावर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच तिन्ही नेते एकत्र येण्यावर भाष्य केले. ते म्हणाले, सगळे डावीकडे गेले म्हणून मी उजवीकडे आलो. त्यांच्या या व्यक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, आशीषजी म्हणाले की राज ठाकरे यांनी बोलावलं म्हणून मी आलो. पण मी तुम्हाला सांगतो, २०१९ पर्यंत उद्धवजी यांनी जेव्हा-जेव्हा बोलावलं, तेव्हा-तेव्हा मी गेलो. त्यानंतर त्यांनी बोलावलंच नाही. मी वाट बघत राहिलो. असे म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.