चार आमदारांचा एकच मामा! प्रतापसिंह पाटलांच्या विजयानंतर राजन पाटलांची चर्चा; अनगरचे मामा-भाचे राजकारणात

Who Is Rajan Patil? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील विजयी झाल्यानंतर सोलापूरच्या मामाची राज्यभर जोरदार चर्चा सुरु झालीय. हे मामा नेमके कोण आहेत? अनगरच्या पाटील कुटुंबातील मामा-भाच्यांनी राजकारणात कसं आपलं वर्चस्व निर्माण केलयं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
RAJAN PATIL
RAJAN PATILsaam tv
Published On: 

दादांच्या राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाणांच्या 18 वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लावत प्रतापसिंह पाटलांनी ऐतिहासिक विजय मिळवला...मात्र, या विजयानंतर एका नव्या आणि अनोख्या राजकीय नात्याची राज्यभरात तुफान चर्चा रंगली आहे. ती म्हणजे 'चार आमदारांचा एकच मामा! सोलापूर जिल्ह्यातील अनगरचे मातब्बर नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांचे चार भाचे आता विधीमंडळात पोहोचले आहेत. राजन पाटील यांच्या कुटुंबाशी थेट नातेसंबंध असलेले तब्बल चार आमदार आता विधानमंडळात प्रतिनिधित्व करतायत...

गेवराई मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे अजित दादांच्या राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित हे राजन पाटील यांचे सख्खे भाचे आहेत.

परभणीचे ठाकरेसेनेचे आमदार राहुल पाटील हेदेखील राजन पाटील यांचे भाचे आहे.

राजन पाटील यांच्या बहिणीच्या मुलीचे पती म्हणजेच त्यांचे भाचे जावई राजेश विटेकर हेदेखील विधीमंडळात भाजपचे आमदार आहेत.

तर आता छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा पराभव करून विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार प्रतापसिंह पाटीलही राजन पाटलांचे भाचे आहेत...

मामा आणि भाच्यांनी वेगवेगळ्या पक्षातून वेगवेगळ्या मतदारसंघातून आमदारकी मिळवली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनगरच्या पाटील घराण्याचा प्रभाव केवळ एका तालुक्यापुरता मर्यादित राहिलेला नाही.... विधान परिषदेतील पदवीधरच्या विजयाने महाविकास आघाडीचा उत्साह तर वाढवला आहेच, पण सोबतच राजन पाटलांच्या राजकीय साम्राज्याची आणि कौटुंबिक ताकदीची चुणूक संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा पाहायला मिळालीय... एकाच मामाचे चार-चार भाचे आमदारकी गाजवत असल्याने 'नाद करायचा पण मामा-भाच्याचा नाही!' अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.