गोकुळवर पुन्हा प्रशासकराज? बैठकीला दांडी, महायुतीचा नवी रणनीती; एकतर्फी अध्यक्ष निवडून पाटलांचा नवा डाव

Gokul Milk Union Chairman Election Controversy: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीत नवा ट्विस्ट! महायुतीच्या संचालकांची सभेला दांडी, सतेज पाटलांकडून शशिकांत च्युवेकरांची एकतर्फी निवड. गोकुळवर पुन्हा प्रशासकराज येणार का? जाणून घ्या संपूर्ण राजकीय घडामोडी.
Gokul chairman election
Gokul chairman electionsaam tv
Published On: 

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीत मोठा ट्विस्ट आलाय.

महायुतीनं सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीचा अध्यक्ष होऊ नये यासाठी नवा डाव टाकलाय. समविचारी आघाडीला १३ जागा मिळाल्या आहेत. मात्र अध्यक्षपद निवडीच्या गणपूर्तीसाठी १४ संचालकांची आवश्यकता असते. हा धागा पकडून महायुतीच्या सर्व संचालकांनी या बैठकीला दांडी मारली. सतेज पाटलांना रोखण्यासाठी महायुतीनं थेट प्रशासकराज आणण्याच्याच हालचाली सुरू केल्याचं बोललं जातंय. यासाठी त्यांनी काय रणनीती आखलीय ते पाहूयात....

'गोकुळ'वर पुन्हा प्रशासकराज?

- सतेज पाटलांचा अध्यक्ष होऊ नये म्हणून महायुतीच्या सर्व संचालकांनी निवड सभेला अनुपस्थित राहून कोरम अपूर्ण ठेवला

- 14 संचालकांची गरज असताना महायुतीचे 12 संचालक गैरहजर राहिले

- त्यामुळे अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला खीळ बसू शकते आणि महायुतीला रणनीती आखण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो

- महायुतीकडून समविचारी आघाडीच्या काही संचालकांच्या फोडाफोडीचे पडद्यामागे जोरदार प्रयत्न होऊ शकतात

- संचालक फुटले नाहीत, तर पुढील सभांनाही वारंवार अनुपस्थित राहून गोकुळवर पुन्हा प्रशासक राज आणण्याच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जातंय.

महायुतीनं तांत्रिक बाब समोर ठेवून ही रणनीती आखली असली तरी सतेज पाटलांनी मात्र कोरम नसतानाही बहुमताच्या आधारावर शशिकांत च्युवेकरांची अध्यक्षपदावर एकतर्फी निवड करून महायुतीला शह दिल्याचं बोललं जातंय. यामुळे महायुतीवर नैतिक दबाव वाढण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळेच की काय मुश्रीफांनी आता वेगळाच सूर आळवलाय.

गोकुळवर गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासकराज सुरू आहे. यामुळे गोकुळ दूध संघाचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप संचालकांकडून करण्यात येतोय. त्यामुळे पुन्हा प्रशासकाकडे कारभार देण्याविरोधात कोल्हापूरकरांमध्ये रोष वाढू शकतो. त्यामुळेच सतेज पाटलांनी एकतर्फी अध्यक्ष निवडीचा डाव टाकल्याचं बोललं जातंय. आता या निवडीला महायुती आव्हान देणार की समन्वयानं घेत गोकुळला प्रशासकराजपासून वाचवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.