Fact Check: तुमच्या सोन्यात चायनीज पावडरची भेसळ? सोन्याचं वजन वाढवण्यासाठी नवी शक्कल?

Gold Fraud Claim Exposed: आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...तुम्ही घेत असलेल्या सोन्यात चायनीज पावडरची भेसळ केली जात असल्याचा दावा करण्यात आलाय...चायनीज पावडर वजन वाढवण्यासाठी वापरली जाते असा दावे केलाय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात...
GOLD ADULTERATION FACT CHECK
GOLD ADULTERATION FACT CHECKsaam tv
Published On: 

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्काच बसला असेल...

तुम्ही विकत घेत असलेलं सोनं नकली असल्याचा दावा या व्हिडिओतून करण्यात आलाय...सोन्यात चायनीज पावडर वापरून सोन्याचं वजन वाढवलं जातंय असा दावा करण्यात आलाय...या व्हिडिओत बघा, कशाप्रकारे या सोन्याचं वजन वाढवलं जातंय...

चीनमधून रिनियम पावडर आयात केली जात असून, ती सोन्यामध्ये मिसळून विकली जातेय असा दावा व्हिडिओतून केलाय...या रिनियम पावडरमुळे सोन्याचे वजन 10 ते 20 ग्रॅमने जास्त होते...धक्कादायक बाब म्हणजे, रिनियमची डेन्सिटी ही सोन्याच्या बऱ्याच जवळ आहे. त्यामुळे तुम्ही फक्त वजन बघून सोने घेत असाल किंवा एखादी नॉर्मल टेस्ट करत असाल, तर तुम्ही सर्वात मोठा धोका पत्करत आहात...असा दावा केलाय...सोनं हा सगळ्यांच्याच जीवाळ्याचा विषय आहे...महिला आवडीने सोन्याचे दागिने घालतात...आता एक तोळा सोन्याची किंमत जवळपास 1 लाख 40 हजार ते दीड लाख इतकी आहे...त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने एक्सपर्टला हा व्हिडिओ दाखवला...आणि त्यांच्याकडूनच अधिक माहिती जाणून घेतली...

सोन्यामध्ये अशी पावडर मिसळली जात नाही

अशी कुठलीही पावडर बाजारात उपलब्ध नाही

आपल्याकडे असे प्रकार कुठले उघडकीस आलेले नाही

पण ही रिनियम पावडर काय असते पाहुयात...

रिनियम पावडर काय असते?

रिनियमची घनता सोन्याच्या इतकीच असते

वजनाच्या बाबतीत ते सहसा ओळखता येत नाही.

रिनियम आगीत न जळता टिकून राहतं

चीनमध्ये गुन्हेगार सोन्यात रिनियम पावडर वापरतात

प्राथमिक तपासणीत ते अस्सल सोने असल्याचं भासतं...

चीनमध्ये गुन्हेगार ही पावडर मोठ्या प्रमाणात वापरतात...सोन्याच्या तुलनेत रिनियम पावडर स्वस्त मिळते आणि फसवणूक करणारेही पावडर वापरतात...अशा प्रकारे आपल्या देशात पावडर सोन्यात वापरली जात नाही असं एक्सपर्टकडून सांगण्यात आलंय...मात्र, तुम्ही सोनं घेताना नीट तपासून घ्या...आमच्या पडताळणीत तुमच्या सोन्यात चायनीज पावडरची भेसळ असल्याचा दावा असत्य ठरलाय...अक्षय बडवे साम टीव्ही पुणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.