gunratna sadavarte
gunratna sadavarte Saam TV
महाराष्ट्र

सदावर्ते आणि पत्नी जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी

जयेश गावंडे

अकोला: एसटी कर्मचाऱ्यांकडून (ST Employee) पैसे गोळा केल्याप्रकरणी अकोट शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. तर उर्वरित दोन आरोपी ऍड. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांनी अकोट न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. या अर्जावर बुधवार (ता. 20) ला अंतिम सुनावणी होणार आहे. अकोल्यातील (Akola) अकोट शहर पोलीस ठाण्यात एसटी कर्मचाऱ्यांकडून निधी गोळा करून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ऍड गुणरत्न सदावर्ते, ऍड जयश्री पाटील, अजय गुजर आणि प्रफुल गावंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चार आरोपीपैकी अजय गुजर आणि प्रफुल गावंडे यांना अटक करण्यात आली आहे.

अकोट येथील न्यायालयात पोलिसांनी सदावर्ते आणि पाटील यांचा ताबा मागण्यांसाठी केलेला अर्ज अकोट न्यायालयाने मंजूर केला, असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी दिली. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते सद्या सातारा पोलिसांच्या अटकेत आहे. वकील सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील, औरंगाबादचा अजयकुमार गुजर आणि प्रफुल्ल गावंडे यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांकडून 300 व 500 रुपये गोळा करून 74 हजार 400 रुपयाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी पैसे गोळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

या प्रकरणातील आरोपी अजयकुमार गुजर आणि बस वाहक प्रफुल गावंडे हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर आता सदावर्ते आणि जयश्री पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर बुधवारी अकोट न्यायालयात सुनावणी होणार आहे, अशी माहिती ऍड. एस. एस. तट्टे यांनी दिली.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

SCROLL FOR NEXT