काँग्रेसवर आघाडीत अत्याचार, नाना पटोलेंनी आमच्याकडे यावे; आठवलेंची खुली ऑफर

राज्यात सध्या राजकारणाचा स्तर घसरला आहे अशी टीका सर्वच पक्षातील नेते करत आहेत.
Ramdas Athwale
Ramdas AthwaleSaam Tv

भंडारा: कांग्रेस वर होत असलेला अत्याचार लक्षात घेता नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार रामदास आठवले यांनी दिला असून त्यांनी आमच्या सोबत यावे अशी ऑफर रामदास आठवले यांनी नाना पटोले यांना दिली आहे. भाजप सत्ता स्थापनेसाठी फोडाफोडी चे राजकारण करीत आहे, मात्र यात भाजपला यश मिळत नाही या प्रश्नावर बोलतांना रामदास आठवलेंनी वरील ऑफर दिली आहे.

सध्या नाना पटोले (Nana Patole) हे डॅशिंग नेते आहेत, त्यांच्या कांग्रेस पक्षाला महाविकास आघाडी सरकार मध्ये पाहिजे तसे महत्त्व मिळत नाही आहे. त्यांमुळे नाना पटोले यांनी सोनिया गांधीशी (Sonia Gandhi) बोलून सरकार मधून पाठिंबा काढावा असे आवाहन आठवलेंनी केले आहे.

दरम्यान राज्यात सध्या राजकारणाचा स्तर घसरला आहे अशी टीका सर्वच पक्षातील नेते करत आहेत. केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकर आहे. आपण विधिमंडळाच्या अधिवेशनात नाना पटोलेंनी त्यांच्याच पक्षाचे मंत्री नितीन राऊत यांची प्रश्न विचारुन कोंडी केली होती. त्यावरुन चांगलेच वातावरण तापले होते. भाजपचे नेते राज्यातील सरकार पडण्याच्या तारखा देत असतात. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आता नवीन तारीख दिली आहे. आता केद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी थेट आमच्याकडे या अशी ऑफर दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com