Sambhajinagar Crime Saam Tv
महाराष्ट्र

Crime: समृद्धी महामार्गावर गोळीबाराचा थरार, मित्राला बंदूक दाखवताना गोळी सुटली अन्...; घटनेचा थरारक CCTV

Sambhajinagar Crime: संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर गोळीबाराची घटना घडली. मित्राला बंदूक दाखवत असताना तरुणाकडून गोळी सुटली. या घटनेत मित्र गंभीर जखमी झाला आहे.

Priya More

समृद्धी महामार्गावर गोळीबाराची भयंकर घटना घडली. मित्राला बंदूक दाखवताना गोळी सुटली आणि थेट तरुणाच्या कमरेला लागली. या घटनेत गंभीर जखमी झालेला तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर ही घटना घडली. हा गोळीबाराचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावरील सावंगी टोल नाक्यावर शुक्रवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. या ठिकाणी काम करणारा तरुण आपल्या मित्राला त्याच्याकडे असलेले पिस्तूल दाखवत होता. हे पिस्तूल कसे चालतात हे दाखवत असताना अचानक पिस्तूलमधून गोळी सुटली आणि ती या तरुणाच्या मित्राला लागली. कमरेला गोळी लागल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला.

भरत घाटगे असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर पिस्तूल दाखवताना गोळी सुटलेला तरुण करण भालेराव आहे. घटनेनंतर करण पिस्तूल घेऊन फरार झाला. हा गोळीबाराचा प्रकार मध्यरात्री घडला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला ताबडतोब रुग्णालयात दाखल केली. पहाटे अडीचच्या सुमारास या प्रकरणी पोलिसांनी करणविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील सावंगी परिसरामध्ये टोल क्रमांक १६ वर भरत घाटगे आणि करण भालेराव हे दोघे कर्मचारी ड्युटीवर होते. आलेल्या वाहनांना पास करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. ड्युटीवर रूममध्ये असताना करणकडे असलेले पिस्टूल कसे चालते हे जाणून घेण्याचे कुतुहूल भरतला होते. यावेळी करण पिस्तूल कसे चालते हे भरतला दाखवत होता. त्याचवेळी पिस्तूलमधून गोळी सुटली आणि थेट भरतच्या कमरेला लागली.

सुदैवाने गोळी कंबर आणि पोटाच्या मध्ये घुसल्याने पोटातील आतड्यांना इजा झाली नाही. तर पिस्टल सोबत बाळगणारा करण भालेराव हा फरार झाला. सदरील घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भरत घाटगे याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. करणवर शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी करणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटवर बंदी, उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update: संभाव्य दहशतवादी हल्ल्या विरोधात एन एस जी ची आयटी पार्क हिजवडी परिसरात मॉक ड्रिल

Diabetes: डायबिटीचे रुग्ण आहात? सकाळी चुकूनही 'या' गोष्टी करु नका

Maharashtra Politics : मोठी बातमी! ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणूक लढणार; विरोधकांचं टेन्शन वाढणार,VIDEO

Shukra Gochar 2025: पाच राशींचं नशीब पालटणार; छप्परफाड होणार कमाई, मिळणार प्रेम, घर, पैसा अन् गाडी

SCROLL FOR NEXT