Jalgaon Crime News : दारू देण्यास नकार, तरुणांची सटकली; हॉटेल मालकावर अंदाधुंद गोळीबार, जळगावमध्ये खळबळ

Jalgaon Hotel Crime : जळगावमधील यावल तालुक्यात आडगाव फाट्यावर रात्री ९:३० वाजता हॉटेल मालक प्रमोद बाविस्कर यांच्यावर गोळीबार झाला. दारू देण्यास नकार दिल्याने हल्ला झाला असून पोलीस तपास सुरु आहे. हल्लेखोर फरार आहेत.
jalgaon crime
jalgaon crimeSaam Tv
Published On

जळगावमधील यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील आडगाव फाट्यावर गुरुवारी रात्री ९:३० च्या सुमारास एका हॉटेल मालकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारू देण्यास नकार दिल्याने हॉटेल मालकावर गोळीबार झाला असल्याचं कारण समोर आलं आहे. प्रमोद श्रीराम बाविस्कर असे जखमी हॉटेल मालकाचे नाव आहे. त्यांच्या मानेला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

हॉटेल मालक प्रमोद बाविस्कर काल रात्री ९:३० च्या सुमारास आपले हॉटेल बंद करून जळगावला जाण्यासाठी कारमध्ये बसले. त्याचवेळी दोन जण त्यांच्याजवळ आले आणि हॉटेल सुरु करून दारू देण्याची मागणी केली. बाविस्कर यांनी हॉटेल बंद केले सांगितले असता संतप्त झालेल्या हल्लेखोरांनी बंदूक काढून थेट बावीस्करांवर रोखली. आणि त्यांच्या दिशेने गोळीबार केला.

jalgaon crime
Akola News : अकोल्यातील 'ती' पतसंस्था डुबली; हजारो नागरिकांचे पैसे रखडले

या गोळीबारात बावीस्करांच्या मानेला गोळी लागल्याने ते जागीच कोसळले. घटनेनंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. बावीस्करांच्या मुलाने आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे.

jalgaon crime
Nagpur : नागपूरात मुसळधार पावसाचा अंदाज, ऑरेंज अलर्ट जारी | VIDEO

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे पथकासह घटनास्थळावर पोहचले आणि त्यांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली. हल्लेखोर अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा तपास घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com