Gudi Padwa 2025 Saam Tv
महाराष्ट्र

Gudi Padwa 2025: जल्लोष नवं वर्षाचा, मराठी अस्मितेचा, हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा; गुढीपाडव्या निमित्त राज्यभर शोभायात्रा

Gudi Padwa: सध्या संपूर्ण राज्यभरातील प्रत्येक शहरात गुढी पाडव्याचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी मिळत आहे. मात्र, मुंबई शहर आणि ठाणे शिवा डोंबिवली या शहरात आजचा दिवस उत्साहात साजरा केला जातो.

Tanvi Pol

Maharashtra Festival: गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा महत्त्वाचा सण मानला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. या दिनानिमित्ताने राज्यभर विविध शोभायात्रांचे आयोजनही केले जात आहे. या शोभायात्रांमध्ये प्रत्येक पारंपरिक वेशभूषा शिवाय ढोल-ताशा पथके, लेझीम आणि भगवे ध्वज, गुढ्या उभारणे आणि विविध संस्कृतींचे दर्शन घडवणारे कार्यक्रम होत असतात.

राज्यातील प्रमुख शोभायात्रा

आज हिंदू नववर्षानिमित्त तसेच गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यातील कोपिनेश्र्वर न्यासाच्या वतीने शोभायात्रा (procession)काढण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोपिनेशेवरच्या पालखीचे पूजन केल्यानंतर पालखीला सुरुवात होणार आहे

मुंबईमधील गिरगाव भागातील शोभायात्रा अत्यंत प्रसिद्ध आहे. गिरगाव येथए हजारो लोक पारंपरिक वेषात सहभागी होतात. आकर्षक देखावे आणि मर्दानी खेळांचे सादरीकरण ही शोभायात्रेची खासियत असते.

 गुढीपाडवा (Gudi Padwa) या सणाच्या निमित्तानं राज्यभरात शोभायात्रा काढल्या जात आहेत. मात्र, डोंबिवली शहरातील शोभायात्रा ही विशेष असते. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण डोंबिवली शहर आजच्या दिवशी शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोल्हापूर महानगर पालिका निवडणूक, जनसुराज्य शक्ती – आरपीआय – पीआरपी यांचा ‘सुराज्य संकल्प’ जाहीरनामा जाहीर

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

IND vs NZ : फिलिप्सची बाप फिल्डिंग; रोहित-गिल झाले शॉक, प्रेक्षकांची वाढली धकधक | Video

आम्ही नाही आणली भाड्याची माणसं... शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची शेरोशायरी|VIDEO

Uddhav-Raj Thackeray Rally: ठाकरे मराठी माणसांचे 'सुरक्षाकवच'; भाऊकी जोमात, विरोधक कोमात

SCROLL FOR NEXT