Manasvi Choudhary
यंदा गुढीपाडवा ३० मार्चला साजरा होणार आहे.
गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो.
याचनिमित्ताने गुढी कशी उभारावी हे जाणून घेऊया.
वेळूची एक काठी घेऊन, ती स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे वस्त्र , फुलांची व साखर माळ घालून त्यावर एक लोटी ठेवावी.
अशा रितीने तयार केलेल्या गुढी दारासमोर रांगेळी घालून त्यावर उभी करा.
घराच्या दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे.
सूर्यास्तापूर्वी गुढीला नमस्कार करून ती उतरवावी.