Horoscope Today : गुढीपाडव्याच्या दिवशी गोड बातमी मिळणार; ४ राशीचे लोक कमावणार पैसाच पैसा

Horoscope Today in Marathi : गुढीपाडव्याच्या दिवशी काही राशीच्या लोकांना गोड बातमी मिळणार आहे. ४ राशीच्या लोकांना अपार श्रीमंती मिळणार आहे. तर पैसाच पैसा कमावणार आहे.
Horoscope News
Horoscope Today Saam tv
Published On

आजचे पंचांग

रविवार,३०मार्च २०२५ चैत्र शुक्लपक्ष,

गुढीपाडवा,अभ्यंगस्नान, संवत्सरारंभ.

तिथी-प्रतिपदा १२|५०

रास- मीन १६|३५ नं. मेष

नक्षत्र-रेवती

योग- ऐंद्रयोग

करण-बवकरण

दिनविशेष-शुभ दिवस

मेष - नूतन संवत्सर,नवीन आशा, नवीन मनोदय घेऊन आज दिवस आलेला आहे. सर्व नव्याने आलेल्या गोष्टी आहेत. आपल्या राशीला उत्तमोत्तम गोष्टी आज मिळतील. वाहन खरेदीचे विशेष योग आहेत.

वृषभ - कलाकारांना विशेष सुंदर असा दिवस आहे. नवीन प्रयोग जुन्या नव्या गुंतवणुकीतून फायदा होईल. आर्थिक विवंचना संपणारे असे हे नवीन वर्ष आपल्याला जाणार आहे.

मिथुन - आपण केलेल्या कामांची प्रशंसा होणार आहे. नवीन वर्षात आणि आजच्या दिवशी सन्मानाने जगण्याच्या अनेक संधी येतील. आज आपल्या वरिष्ठा कडून विशेष कौतुक होईल.

Horoscope News
Vastu Tips: 'ही' कारणे तुमच्या घरात गरिबी आणू शकतात

कर्क - फिरण्याची आवड आपल्याला आहे. त्यात आज कारणच मिळालेले आहे. गुढीपाडव्याच्या शुभ दिनी शिव उपासना, गणेश उपासना विशेष फलदायी ठरेल. तीर्थक्षेत्र भेटी होतील. भाग्यकारक दिवस आहे.

सिंह - नवीन संवत्सर, नवा दिवस आणि अचानक धनलाभ अशा छान गोष्टी आज घडणार आहेत. हुरुपाने आणि जोमाने जरी एकटे असलात तरी कामाला लागाल.

कन्या - या संवत्सरात आजच्या शुभ दिनी नवीन एखादा संकल्प हाती येईल आणि त्याचे सोने करून दाखवण्याची किंवा तुमच्याकडे आहे. हे नक्कीच समजेल. भागीदारीत फायदा होईल.

Horoscope News
Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील मटण, मासे आणि शोरमाची दुकाने बंद करा; शिवसेना नेत्याची मागणी, कारण काय?

तूळ - जोडलेली नाती आज कामास येतील. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. आय आणि व्यय याचा समतोल आज साधावा लागेल. मामाचे विशेष सहकार्य मिळेल.

वृश्चिक - गुढीपाडव्याच्या या महत्त्वाच्या सणाला कुलस्वामिनीची उपासना करणे फायद्याचे ठरेल. अनेक हत्तींचे बळ घेऊन कामाला लागाल. धर्मकारक घटना आपल्याकडून घडतील. कृतकृत्य भावना येईल.

धनु - "ऑल इज वेल" असा दिवस आहे.नवे वर्ष, नवा दिवस, नवे संवत्सर अशात खरेदी नाही केली असे होईल का? वाहन खरेदी, घर खरेदी दागदागिने घेणे आपल्याला आवडेल. अशा नव्या गोष्टींची खरेदी आज होईल. सर्व सुखाने भरलेला दिवस आहे.

Horoscope News
Vastu Shastra: सकाळी सकाळी घरात मांजर येणे काय संकेत असू शकतं?

मकर - गुढीपाडवा आहे म्हणूनच आपल्या पराक्रमाला एक वेगळी उंची मिळेल. नवा जोम आणि जोश जिद्दीने कामाला लागाल. भावंडांचे सहकार्यात आनंद वाटेल.

कुंभ - सणाचा दिवस आणि कुटुंबात पाहुण्यांची रांग, सुग्रास जेवणाच्या पंक्ती आणि आनंदोत्सव असा दिवस आहे. सर्व गोष्टीत आपण मात्र हिरीरीने सहभाग घ्याल. धन योगाला, सुवर्ण खरेदीला उत्तम दिवस आहे.

मीन - बारा राशीमधली आपली रास जरी शेवटची असली तरी आजच्या दिवशी इतरांपेक्षा नव्याने सुरुवात करायला आपल्याला आवडेल. आपला झेंडा अटकेपार लागेल. आनंदाची गुढी उभी कराल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com