Shambhuraj Desai, satara, koyna dam
Shambhuraj Desai, satara, koyna dam saam tv
महाराष्ट्र

Shambhuraj Desai : काेयना धरणाच्या पाणी पातळीने चिंता वाढली, आमदारांच्या मागण्यांबाबत शंभूराज देसाईंनी दिले वचन

Siddharth Latkar

Satara News : सातारा जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. संभाव्य टंचाई पाहता धरणांतील उपलब्ध पाणीसाठा हा प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी राखून ठेवावा. त्याचबरोबर कालावा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणेच धरणांमधील पाण्याचे आर्वतन सोडावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज सातारा येथे अधिका-यांना दिले. (Maharashtra News)

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. देसाई म्हणाले धरणांमधून पाण्याचे आर्वतन सोडताना लोकप्रतिनिधींच्या सूचनेचाही विचार करावा. जिल्ह्यातील ज्या उपसा सिंचन योजनांना गळती लागलेली आहे ही गळती काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाची लवकरात लवकर बैठक घ्यावी. त्याचबरोबर तारळी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबतही बैठक घ्यावी अशा सूचना देसाईंनी केल्या.

देसाई म्हणाले कालव्यामधून जे पाणी सोडले जाते ते शेवटच्या शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहचले पाहिजे याची दक्षता घ्यावी. कोयना धरण अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नाही त्यामुळे पिण्याचे पाण्याचे पुनर्नियोजन करावे.

उरमोडी व कण्हेर धारणांमधील सातारा शहरासाठी पाणी राखीव ठेवावे. कालव्याद्वारे पाणी सोडल्यानंतर पाणी वळविण्यासाठी कालवे फोडणा-यांवर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करावे. तसेच पोलीस विभागाने गुन्हे झालेल्या व्यक्तींवर कडक करवाई, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी बैठकीत केल्या.

पाणी टंचाईच्या उपाययोजनांना निधी कमी पडू दिला जाणार नाही

पाणी टंचाईला समोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. या विविध उपाययोजनांना शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री देसाई यांनी जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठकीत दिली.

ज्या तालुक्यात टंचाई निर्माण होईल अशा तालुक्यातील जनावरांसाठी चारा छावण्यां ऐवजी लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता चारा डेपोचे प्रस्ताव प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा. मोठ्या गावांमध्ये लोकसंख्येचा विचार करुन टँकरच्या खेपा कराव्यात. तसेच छोटी गावे व डोंगर दऱ्यातील गांवासाठी छोट्या टँकरने पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करावी.

विहिर दुरुस्ती, विहिरीचे अधिग्रहण तसेच इतर उपाययोजनांचे प्रस्तावही जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावेत. तसेच आमदार महोदयांसमवेत तालुकास्तरीय टंचाई आढावा बैठक घ्यावी. त्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करुन सुचविलेल्या उपाययोजना कराव्यात. आवश्यक भासेल तेथे टँकर सुरु करा. टंचाईबाबत सतर्क व संवेदशील असल्याचेही पालकमंत्री देसाई यांनी बैठकीत सांगितले.

या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, अनिल बाबर, शिवेंद्रसिंहराजे भोसले (shivendraraje bhosale), जयकुमार गोरे (jaykumar gore), दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (jitendra dudi), पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, शाखा अभियंते यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HIV Vaccine : वैद्यकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी! HIV वरील व्हॅक्सिनची यशस्वी चाचणी

किंमत फक्त 65,514 रुपये! वजन 93 किलो, मायलेज 50; जबरदस्त आहे TVS ची ही स्कूटर

Zero Shadow Day: चंद्रपुरात नागरिकांनी अनुभवला शून्य सावली दिवस, हे नेमकं काय असतं? जाणून घ्या

Lok Sabha Election: काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव निश्चित, विरोधी आघाडीत फूट पडण्यास सुरुवात: PM मोदी

Iran News: इराण राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, अपघात की इस्त्रायकडून घातपात?

SCROLL FOR NEXT