governor bhagat singh koshyari , nana patole , mumbai, maharashtra , chandrapur, marathi manus saam tv news
महाराष्ट्र

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची महाराष्ट्रातून उचलबांगडी करा; काँग्रेस आक्रमक

आज अदानी-अंबानी यांना महाराष्ट्राने मोठे केले.

संजय तुमराम

चंद्रपूर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांनी शुक्रवारी मुंबईत केलेलं वक्तव्य बेताल आहे. महाराष्ट्राने (Maharashtra) गुजराथी आणि राजस्थानी लोकांना पोसले आणि मोठे केले. अदानी-अंबानी या राज्यात मोठे झाले. आज हे वक्तव्य करून राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. यासाठी त्यांनी तमाम मराठी बांधवांची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. भाजपने (BJP) त्यांना परत बोलवावे असेही पटोलेंनी नमूद केले. (governor bhagat singh koshyari news)

अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची (Mumbai) ओळख आहे ती राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी शुक्रवारी केलं हाेतं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या या वक्तव्यानंतर एनसीपी, काॅंग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्र संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागवी अशी मागणी नेत्यांच्या माध्यमातून जाेर धरु लागली आहे.

काॅंग्रेस नेते सचिन सावंत, शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत, एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, एनसीपीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रपूरात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाले यांनी देखील राज्यपालांच्या वक्तव्य बेताल असल्याचे म्हटलं आहे. पटाेले म्हणाले महाराष्ट्राने गुजराथी आणि राजस्थानी लोकांना काय दिलं हे त्यांनी तपासलं पाहिजे. आज अदानी-अंबानी यांना महाराष्ट्राने मोठे केले. राज्यपाल हे राज्यपालाच्या खूर्चीवर बसून सूडबूद्धीने वागत आहेत. केंद्र सरकारनं, राष्ट्रपतींनी राज्यपालांची महाराष्ट्रातून उचलबांगडी करावी अशी भुमिका काॅंग्रेस असल्याचे पटालेंनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato chutney Recipe : चमचाभर टोमॅटोची चटणी जेवणाची रंगत वाढेल, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment : मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

SCROLL FOR NEXT