महाराष्ट्राचा घोर अपमान! राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्यावरुन संजय राऊत कडाडले, मुख्यमंत्र्यांनाही सुनावले...

Sanjay Raut Slams CM Eknath Shinde & Bhagat Singh Koshyari : संजय राऊत यांनी राज्यपालांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बंडखोर आमदार आणि भाजपवरही टीकास्त्र सोडलं आहे.
Sanjay Raut Slams CM Eknath Shinde & Bhagat Singh Koshyari
Sanjay Raut Slams CM Eknath Shinde & Bhagat Singh KoshyariSaam TV
Published On

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे त्यांच्या वक्तव्याने नेहमी चर्चेत असतात. काल, शुक्रवारी राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्रावर केलेल्या वक्तव्याने पुन्हा चर्चेत आले आहेत. 'गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका होतेय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही राज्यपालांवर टीका केली आहे. सोबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार आणि भाजपवरही टीकास्त्र सोडलं आहे. (Bhagat Singh Koshyari News In Marathi )

हे देखील पाहा -

काय म्हणाले संजय राऊत?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर मविआ नेत्यामंधून सर्वत्र टीका होतेय. याबाबत राऊतांनी ट्विट करत राज्यापाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोरावर सडकून टीका केली आहे.

राज्यपालांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका

संजय राऊतांनी एकामागोमाग एक सलग तीन ट्विट करत निशाणा साधला आहे. राज्यापालांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडओ शेयर करत लिहीलं की, "थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे... 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता. मुख्यमंत्री शिंदे... ऐकताय ना? की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे.? स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा, दिल्लीपुढे किती झुकताय?" अशी बोचरी टीका राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे.

राज्यापालांसह बंडखोर आमदारांवर टीका

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनाही संजय राऊतांनी धारेवर धरलं आहे. आमदार शहाजीबापू पाटील याच्या व्हायरल डॉयलॉगचा वापर करत बंडखोर आमदारांना म्हणाले की, "काय ती झाडी...काय तो डोंगर...काय नदी...आणि आता...काय हा मराठी माणूस...महाराष्ट्राचा घोर अपमान! ५० खोकेवाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत?" असो खोचक सवाल त्यांनी बंडखोर आमदारांना केला आहे.

मराठ्यांना आवाहन

यानंतर संजय राऊतांनी मराठ्यांना आवाहन केलं आहे, ते म्हणाले "आता तरी... ऊठ मराठ्या ऊठ... शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले? याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे.. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत.. मराठ्या तुलाच उठावे लागेल.." असं राऊत म्हणाले आहेत.

Sanjay Raut Slams CM Eknath Shinde & Bhagat Singh Koshyari
Vasai: मोबाईलवर खेळत-खेळत ती बाल्कनीत आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चिमुकलीच्या दुर्देवी मृत्यूने हळहळ
राज्यपाल नेमकं काय म्हणाले?

आपल्या एका भाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते की, 'गुजराती, राजस्थानी राज्यातून निघून गेले तर आर्थिक राजधानी मुंबई राहणार नाही. राजस्थानी मारवाडी समाजाने व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालये,बांधली व गोरगरिबांची सेवा केली. राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ, मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तेथे तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो. त्यांच्या याच वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com