ladki Bahin yojana update  Saam tv
महाराष्ट्र

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

ladki Bahin yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर हाती आली आहे. नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेमचेंजर घोषणा केली आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही

महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील विविध महापालिकेत सभांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदा नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. नागपूरच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे

- २०२९ मध्ये जे वायब्रँट शहर असतील. त्यात नागपूर असेल असे एका आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानात सांगितले आहे.

- नागपूर हे आधुनिक शहर झालेलं आहे. साऊथी स्टेशनमध्ये पहिल्या दहा शहरमध्ये नागपूर असेल.

- सामान्य माणसाचे काम सतत करत आहोत. आता २४ तास सर्वांना पाणी देत आहोत.

- नागपूर शहर आता टँकर मुक्त शहर असणार आहे. ज्या नागपूर शहरामध्ये हे जे आपलं सांडपाणी आहे. घाण पाणी आहे. गटारीच पाणी आहे हे सगळं पाणी जे आपल्या नाल्यांना प्रदूषित करतो.

- रोगराई पसरवतो महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याच्यावर प्रक्रिया सुरू केली आहे.

- पहिली महानगरपालिका ठरली की ज्यांनी घाण पाण्यावर प्रक्रिया करून त्या घाण पाण्यापासून खत निर्मिती केली.

- 20 निर्मिती कंपनीला विकला, आज या घाण पाण्यापासून महानगरपालिकेला आवक म्हणून मिळत आहे.

- रस्त्याचे जाडे उभे केले नागपूर शहरात संपूर्ण ठिकाणी सिमेंट रस्ते आपल्याला पाहायला मिळत आहे. ५० वर्ष या रस्त्याकडे पाहावं लागणार नाही.

- ४० किमी पर्यंत मेट्रो झाली, आता ४४ किमी होणार.

- मुख्यमंत्री झालो तेव्हा त्यांना मालकीपट्ट्यासाठी मी लढलो आणि त्यांना हक्काचे मालकी पट्टे दिले.

- २५ हजार जणांना मालकी हक्काच पट्टे दिला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये मी भांडलो आणि मालकी हक्काचे पट्टे या सर्व गरजूंना मिळाले.

- ६ सहा महिन्याच्या आत पांढराबोडी भागातील लोकांना पट्टा देण्याचं काम करू. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही पक्के घर बांधण्यासाठी आम्ही पैसे देऊ.

- ७०० कोटी रुपये मेडिकल कॉलेजला दिले आहे. कॅन्सरच्या रुग्णांना सुद्धा आता मोफत उपचार होणार आहे.

- वेगवेगळ्या 10 आजारांना सुद्धा मोफत उपचार होणार आहे.

- ८९ आरोग्य मंदिर आहे. ३०० आरोग्य मंदिर उभे करायचं आहे.

- 1 लाख 23 हजार लोकांना मिहान मध्ये रोजगार मिळाला आहे आयटी हब नागपूर झालेला आहे.

- आम्ही सर्वसामान्य जनतेचे समस्या सोडवतो तेव्हाच आशीर्वाद मागतो.

- नागपूर शहरातील गोरगरिबांची स्वप्न मला पूर्ण करायची आहे.

- प्रत्येक क्षेत्रात नागपूरला एक नंबर आणायचं प्रयत्न आमच्या आहे.

- जो पर्यंत देवा भाऊ आहे तो पर्यंत लाडकी योजना बंद होणार नाही. ती कोणी बंद करणार नाही.

- लाडकी बहिणींना आम्ही आता लखपती दीदी करणार आहोत - जे भाजपचे कार्यकर्ते नगरसेवक लाडक्या बहिणीला लखपती बनवणार नाहीत, त्यांना पदे देणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- राज्यातील 27 जातीच्या प्रस्ताव आता केंद्रीय विभागाकडे गेलाय. याचा फायदा सुद्धा या जातींना होणार आहे.

- येत्या 15 जानेवारीला आपण कमळाची बटन दाबा 16 तारखेला हा तुमच्या देवा भाऊ तुमची काळजी घेईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: रात्री आईवडिलांना झोपेच्या गोळ्या द्यायची, नंतर बॉयफ्रेंडसोबत...; आठवीच्या विद्यार्थिनीचा धक्कादायक प्रकार

Maharashtra Live News Update : प्रचारादरम्यान पैसे वाटले, डोंबिवलीत धक्कादायक प्रकार

Love at first sight: या ३ राशींच्या व्यक्तींना पहिल्याच नजरेत होतं प्रेम

Congress: काँग्रेस आमदाराला बलात्कार प्रकरणी अटक, लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध, धमकी अन् गर्भपात

Maharashtra Politics: माजी आमदार सपकाळांनंतर आणखी एका निष्ठावंत शिलेदाराने सोडली साथ, उद्धव ठाकरेंना पुन्हा एक धक्का

SCROLL FOR NEXT