Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

Thursday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना हेकेखोरपणा सोडावे लागेल. तर काहींना सावध राहण्याची गरज आहे.
Horoscope
Horoscope in Marathi Saam tv
Published On

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक, मोबाईल नंबर - 9860187085

आजचे राशीभविष्य, ८ जानेवारी २०२६

मेष - कामा प्रती एकनिष्ठ रहा. भरपूर संधी चालून येतील त्याचं सोनं करा. तेल किंवा धातूंचा व्यापार करणाऱ्यांना खूप चांगला दिवस आहे.

वृषभ - परिवाराकडे लक्ष द्या. नातेवाईकांमध्ये गैरसमज होऊ शकतो फार बोलणं टाळावं. आत्ममग्न राहून स्वकार्याकडे लक्ष द्यावं.

मिथुन - कच्च्या कानाचे राहू नका. ऐकलेल्या गोष्टींपेक्षा स्वानुभवावर विश्वास ठेवा. ध्यान धारणा केल्यास मनःशांती लाभेल.

Horoscope
मनसेला पुन्हा धक्का; बड्या महिला नेत्याची अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एन्ट्री

कर्क - नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्यास आजचा दिवस उत्तम आहे. कुलदेवतेची पुजा करुन सुरुवात करा. गोड फळे खाऊन घराबाहेर पडावं.

सिंह - अपत्यांची चिंता दूर होईल. अपत्यांसोबत प्रेमानं वागा. त्यांच्या दोषांकडे दूर्लक्ष करा. गुरू ची उपासना करावी.

कन्या - घराबाहेर जास्त वेळ जाईल. मित्रमंडळी सोबत वेळ घालवा. खूप काळजी करायची गरज नाही. संपूर्ण जग तूम्ही चालवत नाही.

Horoscope
Diwali Lighting Vastu Tips: दिवाळीत लायटिंग लावताय? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा निवडा

तूला - आर्थिक व्यवहार जपून करा. उसणे पैसे देणं टाळावं. विशेषतः पत्नीची मनधरणी करावी. गणपतीला दुर्वा अर्पण केल्यास उत्तम.

वृश्चिक - स्वभावातला हेकेखोर पणा सोडा. सद्गुणांचा गुणाकार आणि दूर्गुणांचा भागाकार करा. म्हणजे सगळं आपोआप व्यवस्थित होईल. गरिबांना अन्नदान केल्यास उत्तम.

धनू - परदेशाशी संबंधित नोकरीचे किंवा व्यवसायांचे योग आहेत. दुर्गा देवीची उपासना करावी विशेष लाभ होईल. मौन पाळावे.

Horoscope
Car Vastu Tips: नकारात्मक शक्ती दूर ठेवण्यासाठी कारमध्ये ठेवा 'या' ५ वस्तू, प्रवास होईल सुखाचा

मकर - भूतकाळात केलेला एखादा नवस फेडण्यासाठी प्रयत्न करा. लगेच लाभ होईल. कोणालाही शब्द देणं टाळावं. समाजापासून थोडं अलिप्त राहणं योग्य.

कुंभ - नोकरी बदलाचे योग आहेत. भरपूर प्रयत्न करा. अपेक्षित यश मिळेल. "चिंता करितो विश्वाची" हे धोरण सोडा. तूम्ही समर्थ रामदास स्वामी नाही, संसारात आहात याचे भान ठेवा.

मीन - उद्योगांत नवीन संधी चालून येतील. उद्योगाच्या जाहिराती कडे लक्ष द्या, फायदा होईल. कामगारांची मर्जी राखा, सोडून जाऊ शकतात."अहम् ब्रह्मास्मि" हे धोरण व्यवसायात अंगीकृत करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com