सचिन बनसोडे, शिर्डी
Shirdi Saibaba News: साईभक्तांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. शिर्डीत साईबाबांच्या समाधीसमोर (Sai Baba Samadhi) लावण्यात आलेल्या काचा हटवण्याचा महत्वपूर्ण निर्णय साई संस्थानने घेतला आहे. त्यामुळे भाविकांना पूर्वीप्रमाणे समाधीला हस्त स्पर्श करून साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे. शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थान प्रशासन यांच्यात पार पडलेल्या बैठकीत समाधी समोरील काचा आणि जाळी हटवण्यासोबतच आणखी काही निर्णय घेण्यात आले आहेत. (Shirdi Latest News)
साईभक्तांना साईबाबांचे दर्शन अधिक सुकर व्हावे यासाठी शिर्डीकरांच्या (Shirdi) मागणीनुसार सामान्य भाविकांना साई मंदिरातील समाधीपुढील काच काढून दर्शन देणे, गर्दीच्या वेळी कमी उंचीची काच लावणे, व्दारकामाई मंदिरात आतील बाजूस भाविकांना प्रवेश देणे, ग्रामस्थांसाठी मंदिर परिसर गेटवर येणे-जाणेकरिता मार्ग मोकळा करणे, साईंची आरती सुरु असताना भाविकांना गुरुस्थान मंदिराची परिक्रमा करु देणे, मंदिर परिसरात लावण्यात आलेले जास्तीचे बॅरिगेट काढणे आणि श्री साईसच्चरित हे काही भाषेमध्ये कमी आहे ते लवकरात लवकर उपलब्ध करुन देणे आदींबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. (Maharashtra News)
दरम्यान यंदा दिवाळीच्या निमित्ताने साईबाबांच्या चरणी लाखो भक्तांनी दर्शन घेतले आणि कोट्यवधींचे दान केले आहे. यावेळी भाविकांनी साईंच्या झोळीत कोट्यवधींचं भरभरून दान दिलं आहे. २० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या १५ दिवसांत तब्बल १८ कोटी रुपयांचे दान साई संस्थानला प्राप्त झाले आहे. यात रोख रक्कम, चेक, सोने-चांदी तसेच २९ देशांतील परकीय चलनाचा समावेश आहे. (Latest Marathi News)
दक्षिणा पेटी : ३ कोटी ११ लाख ७९ हज़ार १८४ रुपये.
देणगी काउंटर : ७ कोटी ५४ लाख ४५ हज़ार ४०८ रुपये.
ऑनलाइन देणगी : १ कोटी ४५ लाख ४२ हज़ार ८०८ रुपये.
चेक/डीडी देणगी : ३ कोटी ३ लाख ५५ हजार ९४६ रुपये.
मनीआर्डरद्वारे : ७ लाख २८ हजार ८३३ रुपये.
डेबिट क्रेडिट कार्ड देणगी : १ कोटी ८४ लाख २२ हजार ४२६ रुपये.
सोने : ८६०.४५० ग्रॅम सोने ( ३९.५३ लाख २९ रुपये ).
चांदी : १३३४५. ९७० ग्रॅम ( ५. ४५ लाख रुपये ).
परकीय चलन : २४.८० लाख रुपये ( २९ देशांचे ).
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.