Save Aarey Movement: पर्यावरणवादी कार्यकर्त्याला तडीपारीची नोटीस; आंदोलकांना पोलिसांकडून घाबरवण्याचा प्रयत्न?

Save Aarey Movement News: आरे वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या तबरेज सय्यद या २९ वर्षीय युवकाला काल, बुधवारी पोलिसांनी तडीपारीची नोटीस पाठवली.
Save Aarey Movement
Save Aarey Movementसूरज सावंत
Published On

Save Aarey Movement News: मुंबईचं फुप्फुस म्हणून समजले जाणारे आरे कॉलोनी या परिसरात मेट्रो ३ चे कारशेड बांधण्यात येणार आहे. या कारशेडला अनेक पर्यावरणवाद्यांनी विरोध केला आहे. सरकारला विरोध करण्यासाठी याठिकाणी दर रविवारी अनेक पर्यावरणवादी शांततेत आंदोलन करत असतात. मात्र, शांततेत आंदोलन करणाऱ्या या पर्यावरणवाद्यांना आता पोलिस त्रास देत असल्याचा आरोप होत आहे. आरे (Aarey Colony) वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या तबरेज सय्यद या २९ वर्षीय युवकाला काल, बुधवारी पोलिसांकडून तडीपारीची नोटीस पाठवण्यात आली आहे. (Aarey Colony Latest News)

Save Aarey Movement
Bollywood News: सोशल मीडियावरचा वाद थेट पोलिस ठाण्यात; शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरुन राखी सावंतवर गुन्हा दाखल

मेट्रो-३ मार्गासाठी आरे येथे कारशेड बांधण्यास विरोध होत आहे. सेव्ह आरेसाठी लढा देणाऱ्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांची पोलिस तडीपारी करत असल्याचा आरोप होत आहे. आरे वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या तबरेज सय्यद या २९ वर्षीय युवकाला काल, बुधवारी पोलिसांनी तडीपारीची नोटीस पाठवली. तबरेज सय्यद या युवकाला मुंबई शहर, उपनगर, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून जास्तीत जास्त कालावधीसाठी हद्दपार करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

पोलिसांनी तबरेज सय्यद यांना कारणे दाखवा नोटीस पाठवत, तुमच्याविरोधात तडीपारीची कारवाई का करण्यात येऊ नये? याबाबत बाजू मांडण्यासाठी उद्या म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी साकीनाकाच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात सुनावणी पार पडेल, यासाठी उपस्थित राहण्यास या युवकाला सांगण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Save Aarey Movement
Maharashtra Politics : राज्यात राजकीय अस्थिरता येणार; ज्योतिषाचार्यांचे भाकीत, लवकरच निवडणुका लागणार?

तबरेज सय्यद या युवकाविरोधात एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. यापैकी ३ गुन्हे आरे पोलिस ठाण्यात तर २ गुन्हे पवई पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी तबरेज याने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

"मी आरेसाठी दर रविवारी आंदोलनासाठी येतो. त्यात मागील रविवारी मी एकटाच उभा होतो. मी आरे वाचवा मोहिमेसाठी ठामपणे उभा असल्यानं माझ्याविरोधात ही कारवाई होत आहे. मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय." असा आरोप तबरेज सय्यद याने केला आहे. आरेच्या आंदोलनातील आंदोलकांवर कारवाईची ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे शांततेत विरोध करणाऱ्या आंदोलकांची पोलिसांकडून मुस्कुटदाबी करण्यात येत असल्याचे आरोप अनेकदा झाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com