Maharashtra Politics : राज्यात राजकीय अस्थिरता येणार; ज्योतिषाचार्यांचे भाकीत, लवकरच निवडणुका लागणार?

राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत ज्योतिषाचार्यांनी मोठं भाकित केलं आहे.
Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis Saam TV
Published On

Maharashtra Political Crisis : गेल्या काही दिवसांपासून ५० खोके, मंत्र्यांची तसेच नेत्यांची आक्षेपार्ह विधानं, राज्याबाहेर गेलेले प्रकल्प, यावरून विरोधकांनी शिंदे-भाजप सरकारला (Eknath Shinde) चांगलंच धारेवर धरलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीवर वातावरण ढवळून निघालं आहे. असं असतानाच, आता राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत ज्योतिषाचार्यांनी मोठं भाकित केलं आहे. (Maharashtra News)

Maharashtra Political Crisis
Shivsena : संजय राऊतांनंतर ठाकरे गटाचा बडा नेता अडचणीत; कोर्टाने बजावलं समन्स

लवकरच राज्यात राजकीय अस्थिरता येणार असं ज्योतिषाचार्यांनी सांगितलं आहे. नाशिकचे ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे यांनी हे भाकित केलं आहे. त्यांच्या भाकिताची चर्चा महाराष्ट्रभर (Maharashtra Politics) रंगली असून राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार, अशी चर्चा रंगली आहे.

१५ दिवसांच्या अंतराने आलेल्या सूर्य आणि चंद्र ग्रहणाच्या परिणामुळे राज्यात राजकीय अस्थिरता येईल, असं भाकित धारणे यांनी केलं आहे. २९ वर्षांपूर्वी १५ दिवसांच्या अंतराने आलेल्या सूर्य आणि चंद्रग्रहनाच्या परिणामुळे तत्कालीन केंद्र सरकार अस्थिर झालं होतं, असा दाखलाही नरेंद्र धारणे यांनी दिला आहे.

Maharashtra Political Crisis
Pratapgad : प्रतापगडाच्या पायथ्याशी मोठी कारवाई; अफजलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमण पाडलं

एकीकडे विरोधक हे राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे दावे करत आहेत. त्यातच आता ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे यांनी हे भाकित केल्याने राजकीय चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरच राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काय म्हणाले नरेंद्र धारणे?

महाराष्ट्रात असलेल्या राजकीय अस्थिरतेची स्थिती ही १५ दिवसांच्या अंतराने आलेल्या सूर्य आणि चंद्र ग्रहणामुळे आलेली आहे. येणाऱ्या पुढच्या ४० ते ५० दिवसांच्या काळात ही राजकीय अस्थिरता अधिकच वाढेल. २९ वर्षांपूर्वी अशीच स्थिती आली होती. त्यावेळी केंद्र सरकार अस्थिर झालं होतं. त्याप्रकारची घटना महाराष्ट्र घडण्याचे योग दिसत आहे, असं भाकित ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे यांनी केलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com