Shivsena : संजय राऊतांनंतर ठाकरे गटाचा बडा नेता अडचणीत; कोर्टाने बजावलं समन्स

एकीकडे संजय राऊत हे तुरूंगातून बाहेर आल्यानंतर आता दुसरीकडे शिवसेना नेते आणि माजी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam TV
Published On

Shivsena Anil Parab Latest News : एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असताना, दुसरीकडे शिवसेनेचा आणखी एक बडा नेता अडचणीत येण्याची शक्यता आहे. माजी परिवहनमंत्री अनिल परब यांना दापोली कोर्टाने समन्स बजावलं आहे. त्यांना १४ डिसेंबरला कोर्टात हजर राहा, असे आदेश देण्यात आले आहे. (Maharashtra News)

Uddhav Thackeray
Pratapgad : प्रतापगडाच्या पायथ्याशी मोठी कारवाई; अफजलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमण पाडलं

शिवसेना खासदार संजय राऊत मागील १०३ दिवसांपासून तुरूंगात होते. कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीने त्यांची तुरूंगात रवानगी केली होती. जामीन मिळण्यासाठी संजय राऊतांचे प्रयत्न सुरू होते. ईडीने केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊतांकडून करण्यात येत होता.

अखेर गुरूवारी पीएमएलए न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. संजय राऊतांना जामीन मिळाताच, शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, एकीकडे संजय राऊत हे तुरूंगातून बाहेर आल्यानंतर आता दुसरीकडे शिवसेना नेते आणि माजी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray
'महाराष्ट्रातील बोके, खोक्यावर बसले'; तुरुंगातून सुटताच संजय राऊतांची तोफ शिंदे गटावर धडाडली

कारण, दापोली न्यायालयाने अनिल परब यांच्यासह तिघांना बजावलं समन्स बजावले आहे. परब यांनी त्याच्या बांधकामात कोस्टल रेग्युलेशन झोनसह अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे पर्यावरण संरक्षण कायदा कलम १५ अन्वये समन्स बजावण्यात आले आहे. याप्रकरणी परब यांना १४ डिसेंबरच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दापोली न्यायालयात केंद्रीय पर्यावरण विभागाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खटल्यावर बुधवारी (९ नोव्हेंबर) सुनावणी झाली याप्रकरणी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने खटला दाखल केला होता. याप्रकरणी कोर्टात युक्तीवाद झाला युक्तीवादानंतर न्यायालयाने समन्स बजावला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com