CM Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी धुळ्यातून केली मोठी घोषणा

CM Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana: राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Priya More

Summary -

  • धुळ्यात मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठी घोषणा

  • लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले

  • योजना बंद होणार नाही असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले

  • महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यातील जाहीर सभेत लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा घेतली. लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार असं म्हणणाऱ्या विरोधकांवर जोरदार टीका केली.

लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या विरोधकांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'राज्यात जेव्हा ऐवढा मोठा विजय आम्हाला मिळाला. महाराष्ट्रात १३७ जागा एकट्या भाजपला आल्या तेव्हा काही लोकं म्हणायला लागले की भाजपवाल्यांना ऐवढ्या जागा मिळाल्या त्यांना आता कुणाची आवश्यकता नाही. ते आता सगळ्यात पहिले काम काय करतील की लाडकी बहीण योजना बंद करतील. १ वर्षापेक्षा जास्त काळ झाला लाडकी बहीण योजना बंद झाली नाही. माझ्या लाडक्या बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कुणीच बंद करू शकत नाही.'

लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'आता मला माझ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ठेवण्यात इटरेस्ट नाही. आता मोदीजींनी सांगितले आहे की लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचे आहे. महाराष्ट्रामध्ये ५० लाख लाडक्या बहिणी लखपती दीदी झाल्या. आता पुढच्या ४ महिन्यांत अजून ५० लाख लाडक्या बहिणी लखपती दीदी होणार आहेत. १ कोटी लाडकींना मी इथे लखपती दीदी करत आहे. हा आकडा इथे थांबणार नाही. ज्यावेळी मी पुढच्या वेळी धुळ्यात महापौर बसल्यानंतर येईल तेव्हा मी महापौरांना प्रश्न विचारेल की धुळ्यातील किती लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवले.'

तसंच, 'धुळ्यामध्ये आपली महानगर पालिका आल्यानंतर होणाऱ्या नगरसेवकांना मी सांगतो की तुम्हाला मी याठिकाणी एक जबाबदारी टाकून जातोय की येणाऱ्या काळात माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकून जात आहे. धुळ्याच्या महानगर पालिकेवर आम्हाला भाजपचा झेंडा हा फक्त महापौर बनवण्यासाठी नाही लावलायचा तर आम्हाला धुळे शहर बदलायचे आहे. या धुळे शहराला एक अधुनिक शहर म्हणून बनवायचे आहे. धुळ्याच्या जुन्या कहाण्या आणि जुना इतिहास सांगून चालणार नाही. आपल्याला भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर वर्तमान बदलावा लागेल आणि वर्तमान बदलण्याची हिंमत मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत आहे हे आपण दाखवून दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT