Deputy CM Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! ₹2100 कधीपासून मिळणार? निवडणुकीतील विजयानंतर शिंदेंची मोठी घोषणा

Deputy CM Eknath Shinde: नगरपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली. लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार याबाबत त्यांनी स्पष्ट सांगितले.

Priya More

Summary:

  • नगरपंचायत निवडणुकीतील विजयानंतर एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली

  • लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपयांचा हप्ता लवकरच येईल

  • योजना बंद होणार नाही असे एकनाथ शिंदेंनी सांगितले

  • दोन महिन्यांचे 3000 रुपये एकत्र मिळण्याची शक्यता

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकींसाठी मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हफ्ता लवकरच दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. ही योजना कधीही बंद होऊ शकत नाही असे त्यांनी स्पष्ट करत विरोधकांवरच निशाणा साधला.

नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये विजय झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाडक्या बहिणींचे अभिनंदन केले. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'शिवसेनेच्या आजपर्यंतच्या इतिहासात एवढे नगराध्यक्ष निवडून आले नव्हते. यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे आणि लाडक्या बहिणींचे अभिनंदन. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुलींना उच्च शिक्षण मोफत, आरोग्याबाबत अनेक योजना राबवल्या याचा मला आनंद आणि समाधान आहे. अडीच वर्षांच्या काळात जी महाविकास आघाडीने स्थगिती दिली होती ते सगळे अडथळे दूर केले आणि महाराष्ट्राला पुढे नेलं.'

'माझी सर्वात जास्त आवडती योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. अनेकांनी या योजनेला विरोध केला. मात्र विरोध मोडून काढत आम्ही ही योजना सुरू ठेवली. कोणताही माई का लाल ही योजना बंद करू शकत नाही. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार म्हणजे देणार. योग्य वेळी आल्यावर आम्ही लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीत वाढ करू.' अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

दरम्यान, लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच ३००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. आचारसंहितेच्या कालावधीतच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना दोन महिन्यांचे अनुदान एकत्र दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. १४ जानेवारीआधी लाडक्या बहिणींना २ हफ्त्यांचे ३००० रुपये एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनपा निवडणुकीनंतर राज्यभर दौरा करणार-सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

Marathi Serial: आजारी वडिलांना भेटणं निर्लज्जपणा आहे? मालिकेवर प्रेक्षकांचा संताप! म्हणाले, 'काय आदर्श घ्यायचा प्रेक्षकांनी...'

Maharashtra Politics: दे धक्का! अजितदादांचं भाजपला जशास तसे उत्तर; 'किंगमेकर' नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

राहुल गांधी, सोनिया गांधींना मोठा झटका; नॅशनल हेराल्ड प्रकरणी ED च्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाची नोटीस

विजयी मिरवणुकीत राडा; कारवर फटाके फोडण्याला विरोध केला, भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून २ महिलांना मारहाण

SCROLL FOR NEXT