Local Body Election Results: नगरपरिषद -नगरपंचायत निवडणुकीत महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; कुणाचे किती नगराध्यक्ष अन् नगरसेवक?

Nagarparishad Election Result: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक निकाल रविवारी लागला. या निकालामध्ये भाजपने मुसंडी मारली. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपचे सर्वात जास्त नगराध्यक्ष निवडून आले. राज्यभर सध्या महायुतीवर विजयोत्सव केला जात आहे.
Local Body Election Results: नगरपरिषद -नगरपंचायत निवडणुकीत महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; कुणाचे किती नगराध्यक्ष अन् नगरसेवक?
CM Devendra Fadnavis Saam tv
Published On

Summary -

  • नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकीत महायुतीची जोरदार मुसंडी मारली

  • २८८ पैकी २२४ नगराध्यक्ष महायुतीकडे आहेत

  • राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला

  • भाजपनचे १२० नगराध्यक्ष आणि ३३२५ नगरसेवक निवडून आले

  • शिंदे गट आणि अजित पवार गटालाही मोठे यश

नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. विधानसभेप्रमाणेच या निवडणुकीमध्ये देखील महायुतीनेच घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीमध्ये महायुतीने मुसंडी मारली आणि महाविकास आघाडीची घसरगुंडी झाली. राज्यात महायुतीचे २२४ नगराध्यक्ष निवडून आले. तर महाविकास आघाडीला ५१ नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश आले. महायुतीच्या विजयानंतर राज्यभरात विजयोत्सव साजरा केला जात आहे. एकीकडे महायुतीचा विजय झाला असला तरी दुसरीकडे विरोधकांकडून त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. महायुतीच्या या विजयामागे अनेक कारण आहेत ते आपण पाहणार आहोत...

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये २८८ जागांपैकी २२४ ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आले. यामध्ये एकट्या भाजपचे १२० नगराध्यक्ष निवडून आले. त्यांनी १२९ नगरपरिषदा आणि नगरपंचायत पंचायत जिंकल्या. भाजपच्या नगरसेवकांचा आकडा ३३०२ वर गेला आहे. या निवडणुकीमध्ये फक्त भाजपलाच नाही तर महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील लॉटरी लागली. भाजप नंबर वनचा पक्ष ठरला जरी असला तरी शिवसेना शिंदे गटाचे ५६ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ३६ नगराध्यक्ष निवडून आले.

Local Body Election Results: नगरपरिषद -नगरपंचायत निवडणुकीत महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; कुणाचे किती नगराध्यक्ष अन् नगरसेवक?
Sangli: आटपाडी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उत्तमराव जाधव विजयी

तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे ५१ नगराध्यक्ष निवडून आले. यामध्ये काँग्रेसचे सर्वात जास्त म्हणजे ३४ नगराध्यक्ष निवडून आले. तर शिवसेना ठाकरे गटाचे ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ८ नगराध्यक्ष निवडून आले. महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळाले. महाविकास आघाडीला अनेक ठिकाणी हार मानावी लागली.

Local Body Election Results: नगरपरिषद -नगरपंचायत निवडणुकीत महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; कुणाचे किती नगराध्यक्ष अन् नगरसेवक?
Ambernath: अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष भाजपचा, पण सर्वाधिक नगरसेवक शिंदेसेनेचे; वाचा विजयी उमेदवारांची यादी

नगरपरिषद- नगरपंचायतीमध्ये कोणत्या पक्षांचा किती जागांवर विजय?

भाजप - १२९

शिवसेना शिंदे गट - ५१

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - ३३

काँग्रेस - ३५

शिवसेना - ८

राष्ट्रवादी - ८

स्थानिक आघाडी - २४

Local Body Election Results: नगरपरिषद -नगरपंचायत निवडणुकीत महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; कुणाचे किती नगराध्यक्ष अन् नगरसेवक?
Kolhapur Nagarpalika Election: कोल्हापूरमध्ये कुणाचा नगराध्यक्ष? कागल ते गडहिंग्लजपर्यंत १३ पालिकांचे निकाल हाती; वाचा विजयी उमेदवारांची लिस्ट

कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष झाले?

भाजप - १२०

शिवसेना शिंदे गट - ५६

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - ३६

काँग्रेस - ३४

शिवसेना - ९

राष्ट्रवादी - ८

स्थानिक आघाडी - २५

Local Body Election Results: नगरपरिषद -नगरपंचायत निवडणुकीत महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; कुणाचे किती नगराध्यक्ष अन् नगरसेवक?
मोठी बातमी! ३ की २१ डिसेंबर, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी कधी ? कोर्टात आज होणार फैसला

कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक विजयी झाले?

भाजप- ३३२५

शिवसेना शिंदे गट - ८२६

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - ४११

शिवसेना ठाकरे गट - १७०

काँग्रेस - १६१

राष्ट्रवादी - १४८

स्थानिक आघाडी - १९०

Local Body Election Results: नगरपरिषद -नगरपंचायत निवडणुकीत महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; कुणाचे किती नगराध्यक्ष अन् नगरसेवक?
Local Body Election: काय रे भाऊ! नगरपरिषद आणि नगरपंचायत यातील फरक काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com