Railway News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News: एकाच रेल्वे पटरीवर आल्‍या दोन रेल्वे; मोठी दुर्घटना टळली

मोठी दुर्घटना टळली..एकाच रेल्वे पटरीवर आल्‍या दोन रेल्वे

अभिजीत घोरमारे

गोंदिया : एकाच रेल्वे पटरीवर दोन रेल्वे गाड़ी आल्याची घटना गोंदिया (Gondia) लगत असलेल्या छत्तीसगढ़ राज्याच्या डोंगरगढ़ येथे घडली. वेळीच लोकोपायलटच्या लक्षात आल्याने ट्रेन थांबिल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. (Live Marathi News)

बीकानेर- बिलासपुर गाडी ही बीकानेर वरुन निघाली. छत्तीसगढ़ राज्याच्या डोंगरगढ़ येथे पोहचली असता अचानक सारख्याच रेल्‍वे (Railway) ट्रैकवर अचानक माल गाड़ी आली. वेळीच लोकोपायलटने गाड़ी थांबविली. दोन गाड़ीत केवळ 100 मीटरचे अंतर होते. लोकोपायलटच्‍या सदर बाब लक्षात आली नसती तर मोठा अपघात झाला असता.

अर्धा तासाहून अधिक वेळ रेल्‍वे थांबून

दोन रेल्‍वे गाड्या समोरासमोर आल्‍या. रेल्वे विभागाची अक्षम्य चूक प्रवाशांच्‍या जीवावर उठली असती, हे मात्र निश्‍चीत. आता याचा वीडियो मात्र चांगलाच वायरल झाला आहे. एकाच पटरीवर असलेल्‍या दोन रेल्‍वे मार्गस्‍थ व्‍हायला अर्धातासाहून अधिक वेळ लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT