Ulhasnagar News
Ulhasnagar NewsSaam tv

Ulhasnagar News: टीव्ही चोरला तेथेच आणला विक्रीला; व्यापाऱ्यांनी पकडून केले पोलिसांच्या हवाली

टीव्ही चोरला तेथेच आणला विक्रीला; व्यापाऱ्यांनी पकडून केले पोलिसांच्या हवाली
Published on

उल्‍हासनगर : उल्हासनगरात दिवसाढवळ्या इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या बाहेरून टीव्ही चोरीला गेल्याची घटना घडली आहे. हा प्रकार (CCTV) सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून दुसऱ्या दिवशी पुन्हा तो टीव्हीवर विक्रीसाठी आलेल्या या चोराला दुकानदारांनी पकडून पोलीसांच्या (Police) ताब्यात दिले आहे. (Letest Marathi News)

Ulhasnagar News
Nandurbar News: नंदूरबार जिल्ह्यात ४२३६ बालमृत्यू; स्थलांतरामुळे कुपोषणाचे प्रमाण अधिक

कॅम्प नंबर ३ च्या १७ सेक्शन परिसरात बबलू इलेक्ट्रॉनिक दुकानात हा संपूर्ण प्रकार घडला होता. या दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या टीव्ही चोरी (Theft) करून पसार झाला होता. या घटनेची माहिती दुकानदाराला समजताच सीसीटीव्ही फुटेज व्यापार्यांच्या सोशल मीडियावर व्हायरल केले. दरम्यान दुसऱ्याच दिवशी हा चोर पुन्हा त्याच मार्केटमध्ये टीव्ही विक्रीसाठी आला होता.

पोलिसांकडून तपास सुरू

व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजवरून त्याची ओळख पटवून त्याला लगेच पकडले. मध्यवर्ती पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. आता याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून अजून त्याने कुठे कुठे चोऱ्या केल्या आहेत का याचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com