Nandurbar News: नंदूरबार जिल्ह्यात ४२३६ बालमृत्यू; स्थलांतरामुळे कुपोषणाचे प्रमाण अधिक

नंदूरबार जिल्ह्यात ४२३६ बालमृत्यू; स्थलांतरामुळे कुपोषणाचे प्रमाण अधिक
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदुरबार : राज्यात सर्वाधिक कुपोषणाचे जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख आहे. कुपोषण कमी करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार अनेक योजना राबवत असतात. मात्र या योजना खरच लाभार्थींपर्यंत पोहोचतात का? असाच काहीसा प्रश्न आता नंदुरबार जिल्ह्यात उद्भवत आहे. (Breaking Marathi News)

Nandurbar News
Satara Crime News: अल्पवयीन युवकाची हत्या; कामानिमित्त घरातून गेला होता बाहेर

जिल्ह्यात कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च वर्षानुवर्षे केले जात असतात. मात्र कुपोषण आणि बालमृत्यू कमी होण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती सद्या (Nandurbar News) नंदूरबार जिल्ह्यात दिसून येत आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात 0 ते 1 वयोगटातील 3 हजार 506 तर 1 ते 6 वयोगटातील 730 असे एकूण 4 हजार 236 बालमृत्यू झाल्याची नोंद समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे.

स्‍थलांतरामुळे वाढते कुपोषण

जिल्ह्यातून होणाऱ्या स्थलांतरामुळे कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातून स्थलांतर होणारे लहान बाळ आणि मातांसाठी पोषण आहार मिळत नाही. त्यासाठी आता अंगणवाडी मार्फत जनजागृती मोठ्या प्रमाणावर केले जाणार आहे. तर कुपोषणासाठी जिल्हा प्रशासन अनेक प्रयत्न करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खात्री यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com