शुभम देशमुख
गोंदिया : दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ येत आहेत. याच दरम्यान विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी असलेल्या (Gondia) नवनीत प्रश्नसंचाचे मायक्रो झेरॉक्स काढून विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. असा प्रकार करणाऱ्या झेरॉक्स दुकानदारांवर कॉपीराईट अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १ लाख ४५ हजाराचा माल जप्त केला आहे. (Latest Marathi News)
गोंदिया शहरातील झेरॉक्स दुकानदारांवर रामनगर पोलिसांनी (Police) कॉपीराईट अधिनियम उल्लंघनप्रकरणी कारवाई केली आहे. दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच गरजेचे असतात. यासाठी नवनीत प्रकाशनाचे प्रश्नसंच मार्केटमध्ये आहेत. नवनीत एज्युकेशन लिमिटेड कंपनी ही महाराष्ट्र राज्य कॉपीराईट कायदा १९५७ चे कलम ६३ अन्वये प्राधिकृत असून, दुसऱ्या कुणालाही नवनीत २१ अपेक्षित प्रश्नसंच प्रकाशित करण्याचा अधिकार नाही. तरी देखील झेरॉक्स दुकानांवर या प्रश्नसंचाच्या कॉपी काढून त्याची विक्री केली जात होती. (Gondia Police) याबाबतची माहिती कंपनीचे रीजनल सेल्स मॅनेजर यांना मिळाली होती.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलिसांकडून कारवाई
यानंतर कंपनीकडून पोलिसांना याबाबत माहिती देऊन कायदेशीर कारवाईबाबत पोलिसांची मदत घेतली. पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी स्थानिक गुन्हे शाखा व शार पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. यानुसार पोलिसांनी पथकी तयार करून ही कारवाई केली आहे. या कारवाईत प्रश्नसंचांच्या मायक्रो झेरॉक्स व झेरॉक्स मशीन असा १ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.