Buldhana News : प्रवासादरम्यान लक्झरी बसमधून ६० लाख रुपयाची चोरी; आरोपीला ४९ लाख रकमेसह अटक

Buldhana News : प्रवास करित असताना चालकाने जेवणासाठी वडनेर येथे बस थांबविली. जवळपास सर्वच प्रवाशी यावेळी खाली उतरले होते. यावेळी परमार हे देखील बस खाली उतरले होते.
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलढाणा : खासगी बसने प्रवास करत असताना प्रसादरम्यान तब्बल ६० लाख रुपयांची रोकड लांबविल्याची घटना १० फेब्रुवारीला (Buldhana) घडली होती. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी तपस केला असता रोकड चोरणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेशमधून (Madhya Pradesh) ताब्यात घेतले आहे. नांदुरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Live Marathi News)

Buldhana News
St Service Closed : नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशीही एसटी सेवा बंद; ८० लाखाचे नुकसान

अकोला (Akola) येथील प्रमोदसिंग परमार हे अंगड़िया कुरियर सर्व्हिसचे मालक अकोला येथून एका खाजगी लक्झरी बसने अकोल्याहून मुंबईला १० फेब्रुवारी रोजी जात होते. दरम्यान प्रवास करित असताना चालकाने जेवणासाठी वडनेर येथे बस थांबविली. जवळपास सर्वच प्रवाशी यावेळी खाली उतरले होते. यावेळी परमार हे देखील बस खाली उतरले होते. हीच संधी साधत परमार यांनी बसमध्ये ठेवलेली ६० लाख रुपये असलेली बॅग अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली (Theft) होती. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी गुन्हा नोंद करून (Crime News) आरोपीचा शोध घेणे सुरू केले होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Buldhana News
Bribe Trap : निधी मंजूर झाल्याने मागितले लाखाचे बक्षिस; लाच स्वीकारताना ऑपरेटर ताब्यात, ग्रामसेवक पसार

४९ लाख रुपये हस्तगत 

पोलिसांनी तपास करत बॅग चोरी करणारा आरोपी हा मध्य प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी मध्यप्रदेशमधून आरोपीला मुद्देमालासह अटक केली. गुन्ह्यातील आरोपी अजय मुकेश उपाध्याय (वय २२( यांचेकडून चोरीस गेलेले रक्क्मेमधील ४९ लाख रूपये सुद्धा नगदी रक्कम हस्तगत करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com