House Caught Fire at Gondia Gondia Fire
महाराष्ट्र

Gondia Fire News: शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; संसारोपयोगी साहित्यासह लाखोंचा माल जळून खाक

Fire at Gondia's Pindkepar Area: लाकडी घर असल्याने आग आटोक्यात आली नाही. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

Pindkepar News

गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार येथे विद्युत शॉर्ट सर्किटमुळे सकाळी घराला अचानक आग (Gondia) लागल्याची घटना घडली. या घटनेत घरातील सर्व साहित्य व विद्युत उपकरणे जळून खाक झाले आहे. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे.

उन्हाळ्यात प्रामुख्याने आग लागल्याच्या घटना अधिक घडत असतात. पिंडकेपार येथील रमेश पटले यांचे मालकीचे मातीचे घर असून अचानक घराला विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. दरम्यान, शेजाऱ्यांनी आगीवर (Fire) नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाकडी घर असल्याने आग आटोक्यात आली नाही. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगीत लाखोंचे नुकसान 

लाकडी घराला लागलेल्या आगीत यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगीने रौद्ररुप घेत घरातील साहित्यांसह जनावरांचा चारा, लाकडी चिरान व इतर साहित्य जळून खाक झाले. यामुळे रमेश पटले यांचा संसार उघड्यावर पडला आहे. याचा पंचनामा करून मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकमध्ये अनोखे आंदोलन

Uddhav Thackeray : नक्षलवाद संपत आलाय, मग कायदा कुणासाठी? उद्धव ठाकरे जनसुरक्षा विधेयकावरून आक्रमक, VIDEO

उद्धव ठाकरेंचं राजकारण पूर्णपणे संपणार; राऊत यांच्या भविष्यवाणीवर रामदास कदमांचा पलटवार | VIDEO

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की चेहऱ्यावर दिसतात 'ही' लक्षणं

पैशांनी गच्च भरलेली बॅग, हातात सिगारेट, मंत्री संजय शिरसाटांचा व्हिडिओ व्हायरल; राज्याच्या राजकारणात खळबळ | VIDEO

SCROLL FOR NEXT