ATM Crime : हातचलाखीने एटीएमची अदलाबदली करत लुबाडणूक; अंतरराज्य गुन्हेगारांना अटक

Navi Mumbai : ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर नजर ठेवत. समोरच्या व्यक्तीची नजर चुकवून एटीएम मशीनची अदलाबदल करून संबंधितांच्या खात्यातून पैसे काढत असतं.
ATM Crime
ATM CrimeSaam tv

सिद्धेश म्हात्रे 
नवी मुंबई
: बँकेमध्ये एटीएम द्वारे पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या जेष्ठ नागरिक यांच्याकडील एटीएम कार्ड हातचलाखीने अदलाबदली केली जात होती. यानंतर त्यांच्या बँक (Bank) खात्यातून पैसे काढणाऱ्या अंतरराज्य गुन्हेगारांना पोलिसांनी (Police) अटक केली आहे. यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Maharashtra News)

ATM Crime
Nandurbar News : शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा भर; जनावरांच्या चाऱ्याच्या कमतरतेने चारा महागला

एटीएममध्ये (ATM) फेरफार करून लूटमार करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात काही जण ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर नजर ठेवत. समोरच्या व्यक्तीची नजर (Navi Mumbai) चुकवून एटीएम कार्डची (ATM Card) अदलाबदल करून संबंधितांच्या खात्यातून पैसे काढत असतं. याबाबत पोलिसात तक्रार काढलं करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलीस या चोरट्यांच्या मागावर होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ATM Crime
Manmad News : मेहुणे ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार, नेत्यांना केली गावबंदी; दुष्काळी अनुदानासाठी ग्रामस्थांचा निर्धार

७ गुन्ह्याची उकल 

दरम्यान गुन्हे शाखा कक्ष २ कडून या टोळीला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वारंवार वापरल्या जाणाऱ्या एका कारच्या मदतीने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आली असून आणखी तिघे जण फरार आहेत. आरोपींची अधिक चौकशी केली असता एकूण सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com