Nandurbar News : शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा भर; जनावरांच्या चाऱ्याच्या कमतरतेने चारा महागला

Nandurbar News : दुष्काळाच्या झाला शान कराव्या लागत असताना शेतकऱ्यांवर शकत उभे राहिले आहे. दुसरीकडे रब्बी हंगामात तापमानात सातत्याने बदल होत असल्याने दोन हात करत जगवले होते
Nandurbar News
Nandurbar NewsNandurbar News

सागर निकवाडे 

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सहन करावा लागल्या आहेत. एकीकडे (Nandurbar) पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असताना दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याची देखील टंचाई जाणवत आहे. यामुळे चाऱ्याचे दर प्रचंड वाढले आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या (Farmer) अडचणीत वाढ झाली आहे.  (Live Marathi News)

Nandurbar News
Chhatrapati Sambhajinagar Fire: इलेक्ट्रिक वाहनामुळे ७ जणांचा बळी? छत्रपती संभाजीनगरमधील आगीच्या घटनेत नेमकं काय घडलं?

दुष्काळाच्या झाला शान कराव्या लागत असताना शेतकऱ्यांवर शकत उभे राहिले आहे. दुसरीकडे रब्बी हंगामात तापमानात सातत्याने बदल होत असल्याने दोन हात करत जगवले होते, मात्र आता शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा भर पडत आहे. जनावरांना लागणारा चारा मिळत नसल्याने चारा महागला आहे. उन्हाळ्यात ओला चारा कमी मिळतो. त्यामुळे सुक्या चाऱ्यास पसंती दिली जाते. मात्र चाऱ्याचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar News
Cyber Crime : शेअर्स खरेदी विक्रीच्या नावाखाली फसवणूक; दोन सायबर गुन्हेगारांना अटक

यावर्षी (Kharif Season) खरीप आणि रब्बी हंगाम अशा दोन्ही हंगामात पाहिजे तसं उत्पादन शेतकऱ्याला मिळाले नाही. यामुळे चाऱ्याचे प्रश्न उद्भवला आहे. रब्बी हंगामात ज्वारी, मका यांची अपेक्षित लागवड झाली नाही. यामुळे यापासून मिळणाऱ्या चाऱ्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे चारा मिळत नसल्याने चारा महागला असल्याचे चित्र आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com