Kolhapur Theft Video Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Theft Video : कोल्हापूरमध्ये एसटी बसमधून लाखांचे 95 लाखांचे सोने चोरीला, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Kolhapur Crime News: कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक इथं रविवारी सायंकाळी कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेल्या एका होलसेल दागिने विक्रेत्याची सुमारे लाखांचे दागिने असलेली बॅग अज्ञातांनी लंपास केलीये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रंजित माजगावकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

कोल्हापुरहून पुण्याकडे निघालेल्या एका होलसेल दागिने विक्रेत्याची लाखो रुपयांचे दागिने असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत शाहूपुरी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटना कोल्हापुरातील मध्यवर्ती बस (Bus)स्थानक इथे रविवारी ता.३० जून रोजी घडली आहे. मुंबई वडाळा इथले होलसेल सोन्या-चांदीचे दागिने विक्री करणारे सुरजितसिंह चौहान हे विक्रेते २८ जुन तारखेला मुंबईहून कोल्हापूरकडे निघाले होते. सुरजितसिंह यांनी परत येताना पुण्यात थांबून दोन दिवस काही सराफांना नवीन दागिन्यांची माहिती दिली. रविवारी सकाळी ते कोल्हापुरात आले. कोल्हापुरात त्यांनी गुजरी येथील काही सराफ व्यवसायिकांना आपल्याकडील दागिने दाखवले.

यानंतर सायंकाळी ते कोल्हापूरहून (Kolhapur )पुण्याकडे निघाले होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकातून शिवनेरी बसमधून पुण्याकडे जाण्यासाठी निघाले. यावेळी एसटीच्या रॅकमध्ये ठेवलेली ९५ लाख ६९ रुपये किमतीचे दागिने असलेली बॅग अज्ञातांनी लंपास केली.

याप्रकरणी सुरजित सिंह चौहान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शाहूपुरी पोलीससाचे पथक अज्ञात चोरांचा शोध घेत आहे. पोलिसांनी मध्यवर्ती बस स्थानक(station)परिसरातील सर्व सीसीटीव्हीची पाहणी केली असता यामध्ये दोन अज्ञात चोरटे सुरजीतसिंह चौहान यांची बॅग लंपास करून घेऊन जात असतानाच निदर्शनास आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT