Gold- Silver Price Today google
महाराष्ट्र

Gold Rate Today: पितृपक्षात सोन्याचे दर वाढले, 1 तोळ्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा 18k-22k आणि 24k चे दर

Gold Silver Price Hike: सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी महत्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर किती?

Priya More
  • जळगावमध्ये आज १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा दरात वाढ

  • आज जळगाव सराफा बाजारात एक तोळा सोन्याच्या दरात २२०० रुपयांची वाढ

  • पितृपक्षात सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहक नाराज

  • चांदीचे दर आज स्थिर राहिले आहेत

संजय महाजन, जळगाव

जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात सतत चढ उतार होत आहे. पितृपक्षात कधी सोनं-चांदीच्या दरामध्ये घसरण झाली तर कधी वाढ झाली. आज सराफा बाजारत सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला. आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. तर चांदीचे दर स्थिर राहिले. १ तोळा सोनं २२०० रुपयांनी वाढले. सोन्याचे दर वाढल्यामुळे आज सराफा बाजारात सोनं खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली.

जळगावच्या सुवर्ण बाजारात मागील काही दिवसांपासून सातत्‍याने सोनं-चांदीच्या दरात घसरण होत असल्‍याचे दिसून येत आहे. आठवडाभरापासूनच सोनं- चांदीचे भाव सातत्‍याने कमी होत असल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. आठवड्याच्‍या पहिल्या दिवसापासूनच सोन्याच्‍या भावात घसरण होत होती पण आज सोन्याचा भाव वाढला. तर चांदीच्‍या भावात सरासरी २००० रूपयांची घसरण झाल्‍याचे दिसून येत आहे. मात्र आठवडाभरापासून कमी होत असलेला चांदीचा भाव आज मात्र स्थिर राहिला आहे.

गुरूवारी २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव विनाजीएसटी १ लाख ४८ हजार रुपये होता. आज सकाळी सराफा बाजार उघडल्यानंतर सोन्‍याचा भाव १ हजार ७०० रूपयांनी कमी झाला होता. पण दुपारनंतर सोन्याच्या दरामध्ये २२०० रुपयांची वाढ झाली. सध्या १ तोळा सोनं १ लाख ४९ हजार ८०० रुपयांना विकले जात आहे. मात्र चांदीचा भाव स्थिर असून १ किलो चांदी विनाजीएसटी २ लाख २५ हजार रुपयाने विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दोन रस्ते कमी झाले तरी चालतील मात्र शाळेकडे दुर्लक्ष होता कामा नये -भरत गोगावले

Black Clothes During Navratri : नवरात्रीमध्ये काळ्या रंगाचे कपडे घालावे की नाही? जाणून घ्या

शिक्षण क्षेत्रातील 'पंडित' हरपला! राज्यातील ज्येष्ठ नेत्याच्या निधनानं शोककळा

Tech Tips : जुना फोन विकायला काढताय? त्या आधी करा 'या' ६ गोष्टी, नाहीतर होईल डेटा लीक

Skin Care: ग्लोईंग स्किनसाठी महागड्या स्किन केअरची गरज नाही! घरीच बनवा 'हा' फेसपॅक

SCROLL FOR NEXT