संपूर्ण राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत बळीराजानं नुकताच बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. मात्र, याच बैल पोळा सणामुळे नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील एका शेतकऱ्यासमोर नवं संकट उभं राहिलं. पोळ्याच्या सणाला गोडधोड नैवेद्य खाऊ घालताना एका बैलानं चक्क सोन्याची चेन गिळली. पोळा सणादिवशी नेमकं काय घडलं ते पाहूयात...
बैलानं घेतला सोन्याचा घास
शिवाजी बोरसे यांनी पोळ्याला आपल्या लाडक्या बैलजोडीला पुरणपोळीचा नैवेद्य भरवला. याच नैवेद्यासोबत 3 तोळ्यांची सोन्याची चैन बैलाच्या पोटात गेली. नैवेद्य खाऊ घातल्यानंतर काही वेळाने ही सोन्याची चैन गायब असल्याचं लक्षात आलं. सुमारे 4 लाख 71 हजार रुपयांच्या किमतीचं सोनं असल्यानं शेतकरी कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र, बैल जोडीतील कोणत्या बैलानं सोन्याची चैन गिळली याबाबतही मोठा संभ्रम निर्माण झाला.
दरम्यान, लाखोंचा ऐवज आणि बैलाचा जीव एकाच वेळी संकटात आल्यानं बोरसे कुटुंबीय चिंतेत आलं. मात्र, चाळीसगाव येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आधुनिक एक्स-रेच्या साह्यानं बैलाच्या पोटात सोन्याची चैन शोधली. खरंतर, बीडमध्ये धोंड्य़ाच्या महिन्यात जावयासाठी सोन्याची अंगठी असलेला धोंडा मांजरीनं खाल्ला होता. तब्बल चार दिवसांनंतर मृत मांजरीच्या पोटावर शस्त्रक्रिया करून सोन्याची अंगठी बाहेर काढण्यात आली होती. मात्र, तब्बल 10 दिवसांनंतर बैलावर यशस्वी शस्त्रक्रिया करत ही सोन्याची चैन बैलाच्या पोटातून बाहेर काढून बैलालाही जीवदान मिळालं. त्यामुळे सोन्याचा घास गिळलेल्या बैलानं आणि बळीराजानं सुटकेचा श्वास घेतलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.