Gold Price Today Saam Tv
महाराष्ट्र

Gold Rate: सोनं चमकलं! सोन्याच्या दरात २०८०० रुपयांनी वाढ, सुवर्णनगरीत आजचे दर किती?

Jalgaon Sarafa Market Todays Rate: जळगावच्या सराफा मार्केटमध्ये सोनं-चांदीच्या दरात पुन्हा बदल झाले आहे. सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. आजचे दर किती आहेत? ते घ्या जाणून...

Priya More

Summary -

  • जळगावमध्ये सोन्याच्या दरात २,८०० रुपयांची वाढ

  • २४ कॅरेट सोनं १.५३ लाख रुपयांवर पोहोचले

  • चांदीच्या दरातही ६,००० रुपयांची वाढ

  • आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोनं-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू

संजय महाजन, जळगाव

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहे. युद्धामुळे गेल्या महिनाभरापासून सोनं-चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात कधी वाढ तर कधी घसरण होताना दिसत आहे. जळगावच्या सुवर्णनगरीतील सोनं-चांदीच्या दराविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या दिवशी जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गुरूवारी सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण आज पुन्हा सोनं-चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात २ हजार ८०० रुपयांनी वाढ झाली. तर १ किलो चांदीच्या दरात तब्बल ६ हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ५३ हजार २६४ रुपयांवर गेले आहे. तर चांदीचे दर २ लाख ४३ हजार ८० रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून चांदीच्या दरात घसरण सुरू होती. पण आता पुन्हा मोठी वाढ झाली आहे.

गुरूवारी सोनं-चांदीचे दर कमी झाल्यामुळे जळगावच्या सराफा बाजारात ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. पण आज सोनं-चांदी पुन्हा महाग झाल्यामुळे ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवली आहे. ऐन लग्नसराईच्या काळात सोनं-चांदीच्या दरात घसरण होण्याची ग्राहक वाट पाहत आहेत. पण युद्धामुळे सोनं-चांदीच्या दरात कधी घसरण तर कधी वाढ होत आहे. सोनं महाग होत असल्यामुळे खरेदी करताना ग्राहकांना विचार करावा लागत आहे.

दरम्यान, आर्थिक वर्षाच्‍या पहिल्‍या दिवशी म्हणजे १ एप्रिल रोजी सोने- चांदीच्‍या दरात वाढ झाली होती. बुधवारी सोन्याच्या दरात ४ हजारांची वाढ होऊन सोन्याचे विनाजीएसटी दर प्रतितोळा १ लाख ५० हजार रुपये झाले होते. तर चांदीच्या दरात ५ हजार रुपयांची वाढ होऊन प्रतिकिलो चांदी विनाजीएसटी २ लाख ४५ हजार रुपये झाली होती. गुरूवारी सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली होती. चांदीचे दर तब्‍बल प्रतिकिलो १५ हजार रूपयांनी स्वस्त होऊन २ लाख ३० हजार रूपयांवर आले होते. तर १ तोळा सोन्याच्या दरात ४ हजारांनी घसरण होऊन हे सोनं १ लाख ४६ हजार रूपयांवर आले होते.

१ तोळा सोन्याचे जीएसटीसह दर-

२९ मार्च - १ लाख ४५ हजार

३० मार्च - १ लाख ४५ हजार

३१ मार्च - १ लाख ४६ हजार

१ एप्रिल - १ लाख ५० हजार

२ एप्रिल - १ लाख ४६ हजार

३ एप्रिल - १ लाख ५३ हजार

१ किलो चांदीचे जीएसटीसह दर -

२९ मार्च - २ लाख ४० हजार

३० मार्च - २ लाख ४० हजार

३१ मार्च - २ लाख ४० हजार

१ एप्रिल - २ लाख ४५ हजार

२ एप्रिल - २ लाख ३० हजार

३ एप्रिल- २ लाख ४३ हजार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT