Gold Rate Today saam tv
महाराष्ट्र

सुवर्णनगरीत सोन्याला झळाली; एक तोळ्याची किंमत ₹१,१४,३००, दसरा-दिवळीत आणखी वाढ होणार

Gold Prices Hit Record: जळगावात १० ग्रॅम सोन्याच्या दरानं उच्चांकी गाठली. नवरात्र आणि दिवाळीपूर्वीही ग्राहकांची खेरदीची लाट कायम.

Bhagyashree Kamble

  • सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात वाढ.

  • पुढेही सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता.

  • सणासुदीला ग्राहकांच्या खिशाला झळ.

सोन्याच्या दरात वारंवार बदल पाहायला मिळत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या दरामुळे सोन्यानं प्रति तोळा १ लाखांचा टप्पा पार केला आहे. अमेरिकन बँकांनी व्याजदरात कपात केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढलाय. दरम्यान, अमेरिकेनं भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्याचा थेट परिणाम सुवर्णनगरीला झाला असून, दररोज सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र आहे.

आज जळगाव शहरात १ तोळं सोन्याचा दर विक्रमी (GSTसह) १,१४,३०० रूपये इतका नोंदवला आहे. अल्पावधीत ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे निश्चितच ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. मात्र, नवरात्राच्या तोंडावर सराफ बाजार ग्राहकांनी गजबजून गेला आहे.

ग्राहक काही प्रमाणात वेट अँड वॉचच्या भूमिकेत जरी असले तरी, नवरात्र, दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण तोंडावर आल्याने खरेदी टाळणे अनेकांसाठी शक्य होत नाही. त्यामुळे भाव वाढले तरी ग्राहकांचा ओघ कायम असल्याचे सुवर्णनगरीतील व्यवसायिकांनी सांगितले.

जळगावमधील अग्रगण्य सुवर्णव्यवसायिकांच्या मते, अमेरिकन व्याजदर कपातीमुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील या चढउतारांचा थेट परिणाम जळगाव बाजारपेठेवर होत असून, भावात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचं ते सांगतात. या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसणार, एवढं मात्र नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Symptoms: लिव्हर खराब होण्यापूर्वी शरीर देतं 'असे' संकेत, जाणून घ्या कोणती आहेत ती लक्षणं...

Maharashtra Live News Update: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून निषेध

Online Scam: तुमच्या बँक बॅलन्सवर हॅकर्सची नजर; 'या' ट्रिक्सनं सुरक्षित ठेवा पैसा

तुम्ही 10 कोटींचा कुत्रा पाहिलाय का? व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल|VIDEO

मध्यरात्री ठो-ठो, गोळीबाराचा आवाज ऐकून नागरीक घाबरले, बिल्डरच्या ऑफिसवर ३० गोळ्या झाडल्या अन्...

SCROLL FOR NEXT