
प्रसिद्ध गायक जुबिन गर्ग यांचे निधन.
सोशल मीडियावर शेवटचा व्हिडिओ व्हायरल.
चाहत्यांना अश्रू अनावर.
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जुबिन गर्ग यांची एक्झीट मनाला चटका लावणारी ठरली. त्यांनी गायलेले सुपरहिट गाणी आजही तितकीच अजरामर आहेत. जुबिन गर्ग यांचा सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना अपघाती मृत्यू झाला. ते सिंगापूरमधील नॉर्थईस्ट फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करणार होते. मात्र, परफॉर्म करण्यापूर्वी त्यांनी स्कूबा डायव्हिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यातच त्यांचा दुर्देवी अंत झाला. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी शोक व्यक्त केला. सध्या त्यांचा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
जुबिन गर्ग यांच्या शेवटच्या व्हिडिओनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. ते या व्हिडिओतून जनतेशी अखेरचा संवाद साधत आहेत. जुबिन यांनी त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओवर अनेकांनी श्रंद्धाजली वाहिली. तर, काही चाहत्यांना अश्रू अनावर झाले.
जुबिन यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर मृत्यूच्या काही तास आधीच शेअर केला होता. यात त्यांनी चाहत्यांना चौथ्या ईस्ट इंडिया महोत्सवासाठी आमंत्रण दिलं होतं. हा महोत्सव २० ते २१ सप्टेंबर रोजी होणार होता. या कार्यक्रमात जुबिन त्याची लोकप्रिय गाणी सादर करणार होता. हिंदी, बंगाली तसेच आसामी गाणी ते सादर कऱणार होते. पण कॉन्सर्ट होण्यापूर्वी काळानं घाला घातला.
मीडिया रिपोर्टनुसार, जुबिन नॉर्थईस्ट फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म सादर कऱण्यासाठी सिंगापूरला गेला होता. या कॉन्सर्टमध्ये तो लोकप्रिय गाणी सादर करणार होता. मात्र, कॉन्सर्टपूर्वीच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
जुबिन गर्ग यांचा मृत्यू कसा झाला?
मीडिया रिपोर्टनुसार, जुबिन कॉन्सर्टपूर्वी स्कूबा डायव्हिंगसाठी गेले होते. त्यांनी समुद्रात उडी मारली. त्यांनी लाईफ जॅकेट घातलं नव्हतं. त्यांना पाण्याचा अंदाज नाही आला. सिंगापूर पोलिसांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांना पाण्याबाहेर काढून रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र,डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.