Gold mine in nagpur saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्राला येणार सोन्याचे दिवस; नागपूर जिल्ह्यातही आढळला सोन्याचा साठा, त्याचं पुढे काय करणार?

महाराष्ट्राला लवकरच सोन्याचे दिवस येणार आहे. कारण चंद्रपूर आणि भंडारा पाठोपाठ आता नागपूरतही सोन्याचे साठे आढळले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

संजय डाफ

Gold Mine in Nagpur : महाराष्ट्राला लवकरच सोन्याचे दिवस येणार आहे. कारण चंद्रपूर आणि भंडारा पाठोपाठ आता नागपूरतही सोन्याचे साठे आढळले आहेत. तसा अहवाल भूगर्भ सर्वेक्षण विभागानं दिला आहे. त्याशिवाय इतर मौल्यवान धातुसाठे असल्याचंही सर्वेक्षणात पुढं आलं आहे. (Latest Marathi News)

विदर्भाच्या काळ्या मातीखाली सोनं (Gold) दडलंय. भूगर्भ सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ही सत्य पुढं आलं आहे. यापूर्वी चंद्रपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यात सोन्याचे साठे असल्याचं सर्वेक्षणात पुढं आलं होतं. आता राज्याच्या उपराजधानीतही सोन्याचे साठे असल्याचं पुढं आलं आहे.

नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील परसोडी, किटाळा आणि मरुपार या गावांच्या खाली सोन्याचे साठे आहेत. मात्र, त्याचं प्रमाण अत्यल्प असल्याचा अंदाज आहे. याशिवाय इतर मौल्यवान धातुसाठा असल्याचं सर्वेक्षणातुन पुढं आलं आहे.

दरम्यान, नागपूर जिल्ह्यात सोन्याचे साठे आढळले असले तर ते कमी प्रमाणात असल्याने अद्याप खाणींसाठी लिलाव झाला नाही. त्यामुळं हा सोनेरी साठा महाराष्ट्राला झळाळी आणणार की तसाच जमिनीखाली राहणार, ही येणारी वेळ सांगेल.

चंद्रपूर आणि सिंधुदुर्गमध्येही आढळल्या सोन्याच्या खाणी

महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी सापडल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली आहे. चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या दोन सोन्याच्या खाणी सापडल्या. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली . महाराष्ट्रात सोन्याचे दोन ब्लॉक आहेत, याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिली असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राणाजगजीतसिंह पाटील आणि आंबदास दानवे यांच्यातील वाद चांगलाच पेटला

Homemade face cleanser: मेकअप सोडा...चेहऱ्यावर येईल एकदम नॅचरल ग्लो; साबण्याच्या ऐवजी 'या' घरगुती क्लिंसरने धुवा चेहरा

Accident News : सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरला कारची जोरदार धडक, वाहनांचा चक्काचूर

Heart attack symptoms: छातीत होणारी सततची जळजळ अॅसिडिटी समजू नका; ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे

Mumbai : मुंबईतील शाळेत धक्कादायक प्रकार! डब्ब्यात मेथीची भाजी आणल्याने आकारला ५० रुपयांचा दंड, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT