Dhule News: वर्षभरात १ कोटी किंमतीची गांजा शेती उध्‍वस्‍त; धुळ्यातील गांज्या उत्पादनाचा प्रश्न ऐरणीवर

वर्षभरात १ कोटी किंमतीची गांजा शेती उध्‍वस्‍त; धुळ्यातील गांज्या उत्पादनाचा प्रश्न ऐरणीवर
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : दिल्ली येथील श्रद्धा हत्याकांड देखील गांज्याच्या नशेत केले असल्याचे समोर आल्यानंतर आता धुळे (Dhule) पोलिसांसमोर धुळ्यात उत्पादित होणाऱ्या गांज्यावर आवर घालण्याचं मोठे आव्‍हान असणार आहे. या दृष्टिकोनातून धुळे पोलिसांतर्फे (Dhule Police) पावले देखील उचलली जात आहेत. १ कोटीहुन अधिक किंमतीचा गांज्या पोलिसांनी मागील वर्षभरात जप्त केला आहे. (Letest Marathi News)

Dhule News
Beed News: शिष्यवृत्ती पे चर्चा विथ चाय- बिस्किट आंदोलन; बीडमध्ये अनोखे आंदोलन

सध्या दिल्ली (Delhi) येथील श्रद्धा हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला आहे. हे हत्याकांड नराधमाने गांज्याची नशा करून केले असल्याचे उघडकीस आल्यानंतर गांज्या तस्करीचा देखील मुद्दा ऐरणीवर आला आहे. धुळ्यात मोठ्या प्रमाणात गांज्याची शेती अवैधपणे विविध पिकाआड केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे धुळे पोलिसांसमोर गांजा उत्पादन रोखण्याचे मोठे आवाहन उभे ठाकले आहे.

वर्षभरात ३८ कारवाया

गेल्या वर्षभरामध्ये धुळे पोलिसांनी गांज्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया देखील केल्या आहेत. यात वर्षभरात जवळपास 38 कारवाया धुळे जिल्ह्यातील विविध पोलीसठाण्या अंतर्गत करण्यात आले आहेत. यात जवळपास 1 कोटीहुन अधिक किंमतीचा गांज्या पोलिसांनी जप्त केला असून, मागील आठवड्याभरामध्ये गांज्याच्या आठ कारवाया विविध पोलीस ठाणे अंतर्गत केल्या आहे. या कारवायादरम्यान पोलिसांनी गांज्याची शेती करणारे त्याचबरोबर अवैधपणे वाहतूक करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या देखील आवळल्या आहे.

शेती पिकात लागवड

धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी शेती पिकाच्या आडून गांज्याची सर्रासपणे लागवड केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. धुळ्यात उत्पादित केला जात असलेला गांज्या हा राज्यात विविध ठिकाणी त्याचबरोबर राज्याच्या बाहेर देखील अवैधरित्या पाठविला जात असल्याचे देखील उघडकीस आले आहे. कापूस, सोयाबीन त्याचबरोबर विविध पिकांच्या आडून गांजाची चोरटी शेती केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com