Vasai-Virar:महानगरपालिकेच्या द्वारावर झेन-जी आंदोलकांना रोखलं; सुरक्षारक्षकांसोबत तरुणांची धक्काबुक्की

Gen-Z Youth March to Vasai-Virar Municipal Corporation: विरार येथील महानगरपालिका मुख्य कार्यालयावर झेन-जी तरुणांनी मोर्चा काढला. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा आणि सुरक्षारक्षकांसोबत झालेल्या वादामुळे महानगरपालिका मुख्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
Summary
  • वसई विरार महानगरपालिकेवर झेन-जी तरुणांचा भव्य मोर्चा

  • वसई विरारमधील नागरी समस्यांसाठी तरुणांचे आंदोलन

  • विरार महापालिका मुख्यालयात प्रवेश नाकारल्याने तरुण संतप्त

नागरी प्रश्न घेऊन झेन-जी तरुण गल्ली ते दिल्लीच्या रस्त्यावर उतरलेत. केंद्र सरकार असो की स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ताधारी सर्वांना झेन-जी तरुण प्रश्न विचारू लागलेत. आज वसई-विरार शहर महानगरपालिकेवर झेन-जी तरुणांनी भव्य मोर्चा काढलाय.स्थानिक नागरी प्रश्न आणि पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तरुणांनी महापालिकेवर मोर्चा काढला.

सुरक्षारक्षकांसोबत तरुणांची धक्काबुक्की

तरुण आंदोलक जेव्हा आपल्या मागण्या घेऊन विरार येथील महानगरपालिका मुख्य कार्यालयात प्रवेश करू लागले तेव्हा पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रवेश नाकारल. यामुळे संतप्त झालेल्या तरुण आणि सुरक्षारक्षकांमध्ये जोरदार बाचाबाचीनंतर झटापट झाली . तरुणांचा आक्रमक पवित्रा आणि सुरक्षारक्षकांसोबत झालेल्या वादामुळे महापालिका मुख्यालय परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com