Three Dies due to Electric Shock Saam TV
महाराष्ट्र

Three Dies due to Electric Shock : विजेच्या धक्क्याने नातीसह आजी-आजोबांचा मृत्यू, बेळगावमधील हृदयद्रावक घटना

Belgaum News : मन सून्न करणारी घटना बेळगावातील शाहुनगर परिसरात घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Belgaum News : विजेचा धक्का लागून आजोबा, आजी आणि नातीचा जागीच मृत्यू झाला आहे. मन सून्न करणारी घटना बेळगावातील शाहुनगर परिसरात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

इरप्पा गंगाप्पा लमाणी (५० वर्ष), शांतव्वा इरप्पा लमाणी (४५ वर्ष) आणि अन्नपूर्णा हुन्नाप्पा लमाणी (८ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेही कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील रामदुर्गा तालुक्यातील अरबेंची तांडा भागातील रहिवासी आहेत. (Latest Marathi News)

माहितीनुसार, आंघोळीसाठी हिटरच्या मदतीने पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होते. अचानक नातीला पहिल्यांदा विजेचा धक्का बसला. नातीला विजेचा धक्का लागल्याचं पाहिल्यानंतर तिला वाचवण्यासाठी गेलेल्या आजी-आजोबांनाही विजेचा धक्का बसला आणि तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.  (Maharashtra News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : भाजपच्या १६ नगरसेवकांविरोधात गुन्हा, पत्रकार आणि नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप

Naukasana Benefits: वाढलेलं वजन कमी करायचंय? फिट शरीरासाठी घरच्या घरी सकाळी करा 'हा' सोपा योगा

Chinchpokli Forts : चिंचपोकळीजवळील 'हे' ७ हिडन ऐतिहासिक किल्ले तुम्ही पाहिलेत का?

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये पीक कर्ज देण्यास एसबीआय बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेची टाळाटाळ

Good News: नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळी बोनस जाहीर; खात्यात येणार इतके पैसे

SCROLL FOR NEXT