Good News: नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळी बोनस जाहीर; खात्यात येणार इतके पैसे

Navi Mumbai Mahanagar Palika: नवी मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा दणक्यात साजर होणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना ४५००० रुपये बोनस मिळणार आहे.
Good News: नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळी बोनस जाहीर; खात्यात येणार इतके पैसे
Diwali BonusSaam Tv
Published On: 
  • नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

  • सर्व कर्मचाऱ्यांना ४५ हजार रुपये दिवाली बोनस मिळणार

  • आशा स्वयंसेविकांनाही मिळणार ४५ हजार रुपयांचा बोनस

  • त्यामुळे नवी मुंबईतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे

नवी मुंबईच्या पालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. नवी मुंबई महानगर पालिकेने आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी ४५,००० रुपयांचा सानुग्रह अनुदान म्हणजे बोनस महासभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून यंदा त्यांची दिवाळी जास्त गोड होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सरसकट ४५ हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार आहे. अधिकारी आणि कर्मचारी असा भेदभाव न करणारी नवी मुंबई महापालिका राज्यातील एकमेव महापालिका ठरली आहे जिथे सर्वांना समान बोनस दिला जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेत काम करणारे सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि आशा स्वयंसेविकांची यंदाची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे.

Good News: नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळी बोनस जाहीर; खात्यात येणार इतके पैसे
Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

नवी मुंबई महानगर पालिकेच्या महासभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृह नेते सागर नाईक यांनी दिवाळी बोनसबाबत प्रस्ताव सभागृहापुढे मांडला. युनियनकडून ४३,००० रुपये बोनस देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. पण यंदा सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक उत्तमरीत्या साजरी व्हावी, यासाठी मंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ४५,००० रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सागर नाईक यांनी दिली.

Good News: नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळी बोनस जाहीर; खात्यात येणार इतके पैसे
Railway Employees Bonus : दिवाळीआधी रेल्वे कर्मचाऱ्यांची लॉटरी! इतक्या दिवसांचा बोनस मिळणार, मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

मागच्या वर्षी नवी मुंबई महानगर पालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना साधारण ३४,५०० रुपये बोनस दिला गेला होता. आशा स्वयंसेविकांना १८,५०० रुपये बोनस मिळाला होता. यंदा महानगर पालिकेने कोणताही भेदभाव न करता सर्वांना सरसकट ४५,००० रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व पालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महापालिकेच्या या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत करण्यात आले.

Good News: नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळी बोनस जाहीर; खात्यात येणार इतके पैसे
Diwali Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी सरकारकडून बोनस जाहीर, इतके पैसे मिळणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com