Government Schemes : नवरात्रीत नवी मुंबई महापालिकेनं नागरिकांसाठी घेतला मोठा निर्णय, सुरू केल्या ४६ कल्याणकारी योजना

NMMC Schemes 2026-27: नवी मुंबई महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षातले ४६ लोककल्याणकारी योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत.
NMMC Schemes 2026-27
NMMC Schemes 2026-27saam tv
Published On: 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागामार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू आणि गरीब नागरिकांसाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात ४६ लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज भरायला १२ ऑक्टोबर २०२६ पासून सुरूवात झाली आहे. पात्र नागरिकांनी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा, असं आवाहन महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आलं आहे.

महिला, बालके आणि विविध योजना

नवी मुंबई महानगरपालिकेच्या या योजनांमध्ये महिला ब बालकल्याण समिती, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती तसेच खुल्या प्रवर्गासाठीच्या योजनांचा समावेश आहे. महिला व बालके, मागासवर्गीय, आदिवासी आणि खुल्या प्रवर्गातल्या पात्र नागरिकांना या योजनांचा लाभ घेता येणार आहे. विविध सामाजिक घटकांना मदत मिळावी आणि त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, या उद्देशाने या योजना राबवण्यात येत आहेत.

NMMC Schemes 2026-27
Railway Employees Bonus : दिवाळीआधी रेल्वे कर्मचाऱ्यांची लॉटरी! इतक्या दिवसांचा बोनस मिळणार, मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

मोठ्या प्रमाणावर विविध घटकांना सामावून घेणाऱ्या लोककल्याणकारी योजना राबवणाऱ्या राज्यातल्या अग्रगण्य महानगरपालिकांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा समावेश असल्याचं प्रशासनाकडून नमूद करण्यात आलं आहे.

NMMC Schemes 2026-27
Shani Nakshatra : या ५ राशींची चांदी! शनीच्या कृपेने नोकरी, पैसा अन् रखडलेल्या कामांबाबत मिळू शकतो दिलासा

अर्ज कुठे आणि कसा भरायचा?

या योजनांसाठीचे ऑनलाइन अर्ज नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. इच्छुक नागरिकांनी www.nmmc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर संबंधित योजनेची माहिती तपासावी आणि अर्ज करावा.

अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख - १२ ऑक्टोबर २०२६

शिष्यवृत्ती योजनेसाठी शेवटची तारीख - १५ डिसेंबर २०२६

इतर लोककल्याणकारी योजनांसाठी अंतिम तारीख - ३१ डिसेंबर २०२६

नागरिकांनी अर्ज करण्याआधी संबंधित योजनेच्या अटी, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासणे महत्त्वाचे आहे. अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून मुदत चुकणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com