Woman thrown from Truck : महिलेला धावत्या ट्रकमधून फेकलं, ड्रायव्हरला अटक; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Crime News : करोडी गावाजवळ रिंग रोडवर एका ट्रक मधून महिलेला फेकून दिले.
Daulatabad Police Station
Daulatabad Police StationSaam TV
Published On

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चालत्या ट्रकमधून महिलेला फेकल्याची घटना करोडी गावाजवळ घडली आहे. पोलिसांना ट्रक ड्रायव्हरला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून करोडी गावाजवळ रिंग रोडवर एका ट्रकमधून महिलेला फेकून दिल्याची माहिती करोडी गावचे उपसरपंच सोमनाथ नवले यांनी शनिवारी दौलताबाद  पोलीस यांना दिली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत असलेल्या महिलेला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले.

Daulatabad Police Station
Sharad Pawar-Devendra Fadnavis News : अजित पवारांसोबतच्या गुप्त भेटीनंतर शरद पवार-देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर; काय आहे कार्यक्रम?

यानंतर आजूबाजूला सदर घटनेबाबत विचारपूस केले असता एका पानटपरी चालकाने माहिती दिली की, ही घटना त्या ट्रकच्या पाठीमागे असलेल्या एका कार चालकाने बघितली. त्याने ट्रकचा क्रमांक पान टपरी चालकाजवळ लिहून ठेवला होता. (Maharashtra News)

पोलिसांनी त्याआधारे शोध सुरू केला असून ट्रॅफिक पोलिसांनी ट्रकची सविस्तर माहिती दिली. ट्रक मालकाकडे चौकशी केली असता त्याने जीपीएसद्वारे ट्रकच्या लोकेशनची माहिती पोलिसांना दिली. त्याआधारे त्याच क्रमांकाचा ट्रक बीड रोडवर झालटा फाटा येथे दिसला. पोलिसांनी पाठलाग करत ट्रक पकडला. (Latest Marathi News)

Daulatabad Police Station
Buldhana Crime: एकटी असल्याचे पाहून घरात शिरला... जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार; परिसरात खळबळ

ट्रक चालकाचे नाव भानुप्रसाद दुगलाल गौतम असून तो उत्तर प्रदेशचा रहिवाशी आहे. ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार, त्या महिलेला त्याने कोपरगाव येथून बसवले होते. मात्र त्याने असं का केलं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालकविरुद्ध जीवे ठार मारण्याचा उद्देशाने प्रयत्न केले असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com