Girish Mahajan  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashatra Loksabha : 'इंडिया' आघाडी सारखीच परिस्थिती महाविकास आघाडीची होईल; गिरीश महाजन

Maharashatra Loksabha Election : येत्या ८ ते १५ दिवसात महाविकास आघाडीला आणखी धक्के बसणार असल्याचे भाकीत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. धुळ्यात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला.

Bharat Jadhav

Girish Mahajan Comment on Mahavikas Aghadi :

देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी उडालीय. राजकीय नेत्यांमध्ये टीका-टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोपांचे वारे वाहू लागेल आहेत. धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यात महाविकास आघाडीवर निशाणा साधला. देशात ज्याप्रमाणे इंडिया आघाडीची परिस्थिती झाली तशीच राज्यात महाविकास आघाडीची परिस्थिती होणार असल्याचं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार असल्याचं विधान केलंय.(Latest News)

महायुतीच्या जागा वाटपाचे जवळपास ९५ टक्के काम झाले आहे. काही ठिकाणी अद्याप चर्चा सुरू आहे. आज उद्यामध्ये यावरदेखील पार्लमेंटरी बोर्डावर चर्चा सुरू असून उर्वरित जागांवर केंद्रामध्ये शिक्कामोर्तब होऊन प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय. नाशिक, म्हाडा, सातारा, परभणी या चारही जागाबाबत असलेली तिढी सुटेल असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केलाय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जळगाव मतदारसंघात रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात सध्या सुरू असलेल्या वादावर बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी चंद्रकांत पाटील यांना जे मनात वाटले ते बोलले परंतु चंद्रकांत पाटील आणि रक्षा खडसे यांच्यात वाद असला तरी चंद्रकांत पाटील आमच्यासोबत आहेत. त्यांना नरेंद्र मोदीं यांना पंतप्रधान बनवायचं असल्यामुळे आपापसातील वाद सोडून ते आमच्या संपर्कात असल्याचे मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं.

गेल्या वेळचे सर्व रेकॉर्ड तुटतील यावेळी आमचा विक्रमी आकडा असेल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त करत, पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. येत्या ८ ते १५ दिवसात महाविकास आघाडीला आणखी धक्के बसणार असल्याचे भाकीत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणाला राहायची इच्छा नाही, त्यांना सर्वांना मुख्य प्रवाहात यायचं असल्याचं मत व्यक्त करत मंत्री गिरीश महाजन यांनी पुढील काही दिवसात महाविकास आघाडीला आणखी धक्के बघावयास मिळतील, असा दावा गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

धुळ्यात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. भाजपतर्फे आयोजित या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातील बहुतांश कार्यकर्ते उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं, गर्भवती महिलेने चिमुकलीसह विहिरीत मारली उडी

Crime: संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून...

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

SCROLL FOR NEXT